#MeToo : 'तनुश्रीने माझ्यावर बलात्कार केला'

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

अभिनेत्री राखी सावंत आणि तुनुश्री दत्त हा वाद आता विकोपाला गेला आहे. राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे तर समीकरणच झाले आहे. राखी सावंतने आता आणखी एक धक्कादायक आरोप तनुश्री दत्तावर केला आहे. तुनुश्री ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप राखीने केला आहे. तिने ही माहिती पत्रकार परिषेदत दिली आहे.

मुंबई- अभिनेत्री राखी सावंत आणि तुनुश्री दत्त हा वाद आता विकोपाला गेला आहे. राखी सावंत आणि वादग्रस्त विधान हे तर समीकरणच झाले आहे. राखी सावंतने आता आणखी एक धक्कादायक आरोप तनुश्री दत्तावर केला आहे. तुनुश्री ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप राखीने केला आहे. तिने ही माहिती पत्रकार परिषेदत दिली आहे.

या पत्रकार परिषदेत तिने तनुश्रीवर अनेक आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी तनुश्री माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत बऱ्याच रेव्ह पार्ट्यांना जात असे. तेव्हा ड्रग्जच्या नशेत तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला, असे ती म्हणाली. इतकेच नव्हे तर हे आरोप सिद्ध करण्यासाठी दोन साक्षीदार असल्याचेही तिने स्पष्ट केलं. मात्र त्या साक्षीदारांची नावं जाहीर करणार नसून त्यांना कोर्टासमोर हजर करण्याची तयारीही तिने दाखवली.

दरम्यान, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर या प्रकरणात राखी सावंत नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती. राखी सावंते नाना पाटेकरांची बाजू लावून धरली होती. तनुश्रीच्या वतीने राखीवर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanushree Dutta Is Lesbian Touched My Private Parts And Raped Me Said Rakhi Sawant