तापसी इन ऍक्‍शन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री तापसी पन्नूचे "पिंक' चित्रपटातील कामाचे सर्वांनीच खूप कौतुक केले. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर ती मोठ्या ताकदीने वावरली. सध्या तिच्या "रनिंग शादी डॉटकॉम'ची चर्चा रंगली आहे. त्यानंतर तिचा "नाम शबाना' चित्रपट येत असून, त्यात तिचा अनोखा अवतार पाहायला मिळणार आहे. एरवी नाजूक दिसणारी तापसी त्यात चक्क ऍक्‍शन सीन करणार आहे. "नाम शबाना'चा "नाम शबाना सिझल' नामक एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात तापसीच्या ऍक्‍शन अवताराची झलक पाहायला मिळतेय. "नाम शबाना' 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बेबी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यात तापसी अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूचे "पिंक' चित्रपटातील कामाचे सर्वांनीच खूप कौतुक केले. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर ती मोठ्या ताकदीने वावरली. सध्या तिच्या "रनिंग शादी डॉटकॉम'ची चर्चा रंगली आहे. त्यानंतर तिचा "नाम शबाना' चित्रपट येत असून, त्यात तिचा अनोखा अवतार पाहायला मिळणार आहे. एरवी नाजूक दिसणारी तापसी त्यात चक्क ऍक्‍शन सीन करणार आहे. "नाम शबाना'चा "नाम शबाना सिझल' नामक एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात तापसीच्या ऍक्‍शन अवताराची झलक पाहायला मिळतेय. "नाम शबाना' 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बेबी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यात तापसी अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे. एका गुप्त मोहिमेवर लढताना ती दिसेल. चित्रपटात तिने जबरदस्त ऍक्‍शन सीन केलेत. तापसीसह चित्रपटात अनुपम खेर व मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 31 मार्चला तो पडद्यावर झळकेल. 

Web Title: Tapasee in action