राष्ट्रपतींना भेटल्याचा आनंद 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

महिला अधिकारांबाबत असलेल्या"पिंक'या चित्रपटाचा खास शो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात नुकताच दाखविण्यात आला. या वेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह चित्रपटाची सर्व टीम हजर होती. त्यांना भोजनाचेही निमंत्रण होते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच महिने झाल्यानंतरही त्याचे कौतुक अद्यापही होत आहे. यातील अभिनयामुळेच तापसीचीही नवी ओळख निर्माण झाली. खुद्द राष्ट्रपतींनीही तिचे कौतुक केल्याने आता ती प्रचंड आनंदात आहे. मुखर्जी यांना भेटणे हा अत्यंत 

आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता, असे तिने ट्‌व्व्विवववववववटरवर म्हटले आहे. या भेटीवेळी, लहान मुलांना होतो तसा आनंद झाल्याचेही तिने सांगितले. 
 
Web Title: Tapasee pannu meets india president