तापसी पुन्हा कोर्टात 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

पिंक सिनेमात स्वतःवर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी कोर्टाची पायरी चढलेली तापसी पन्नू आता पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढणार आहे; पण या वेळी ती न्याय मागण्यासाठी नाही, तर कुणाला तरी न्याय मिळवून देण्यासाठी.

कारण तापसी अभिनय देवच्या आगामी सिनेमात वकिलाची भूमिका करणार आहे. यात वकील म्हणून आपल्या अशिलाची बाजू मांडताना ती हार मानणार नाहीय. या सिनेमात तिच्यासोबत कोणता अभिनेता असणार आहे, ते अजून ठरलेलं नाहीय; पण जुडवा 2 चं शूटिंग पूर्ण झाल्यावर तापसी लवकरच वकिलाच्या भूमिकेसाठी तयारी करणार, अशी चर्चा आहे.

दिग्दर्शक अभिनय देव सध्या रायता सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये तापसीसोबतच्या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. याचं नाव अजून निश्‍तिच झालेलं नाहीय. नाम शबानामध्ये डॅशिंग अंदाजात दिसलेली तापसी वकिलाच्या भूमिकेचंही चीज करेल, हे मात्र नक्की. 

Web Title: Tapasi again in court