'पिंक'फेम तापसी पन्नू बनली बॉलीवूडची 'बिझी गर्ल'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - काही दाक्षिणात्य सिनेमांसह "चष्मेबहाद्दूर', "बेबी' आदी हिंदी चित्रपटांत झळकलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूला "पिंक'ने खर्ऱ्या अर्थाने प्रकाशात आणले. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्यानंतर तिचे नशीबच पालटले. तिच्याकडे आता बरेच हिंदी चित्रपट असल्याने सध्या ती भलतीच बिझी झाली आहे. काहींचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. काहींच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. आता ती "जुडवा'च्या सिक्वेलमध्ये अभिनेता वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

तापसीने करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली. तिने तमीळ व तेलुगू असे बरेच चित्रपट केले. 2013 साली "चष्मेबहाद्दूर'मधील सीमाच्या भूमिकेतून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बेबी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर "पिंक' चित्रपटात मीनल अरोराची व्यक्तिरेखा तिने साकारली. साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने अप्रतिम काम केले. आगामी वर्षात ती एक-दोन नाही तर तब्बल पाच चित्रपटांत झळकणार आहे. पाचही चित्रपटांत ती वेगवेगळ्या भूमिकेत आहे. त्यातील पहिला चित्रपट जानेवारी 2017मध्ये प्रदर्शित होणार आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' असे त्याचे नाव असून, सुजित सरकार त्याचा निर्माता आहे. तापसी त्यात एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अमित साध तिचा अभिनेता आहे. करण जोहरच्या फेब्रुवारीत प्रदर्शित होणाऱ्या "गाझी' चित्रपटात ती झळकणार आहे. पाणबुडी युद्धनौकेवर आधारित असणारा तो पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यानंतर प्रकाश राज यांच्या "तडका' आणि "मखना' चित्रपटात तापसी काम करतेय. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारच्या "नाम शबाना'त ती स्पेशल एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे मलेशियातील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या "जुडवा'च्या सिक्वेलमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर तापसीचीही वर्णी लागली आहे. राजकुमार राव व बिजॉय नंबियार यांच्यासोबतही तापसी काम करणार असल्याचे समजते.

"पिंक'मुळे माझ्या करिअरला कलाटणी मिळाली. "पिंक' माझ्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला याचा मला अत्यंत आनंद आहे. आता खूप चांगल्या चित्रपटांच्या ऑफर मला येत आहेत; पण मी कथा व माझी भूमिका प्रेक्षकांना आवडतील, असेच चित्रपट स्वीकारणार.
- तापसी पन्नू

Web Title: Tapsi Pannu becomes Bollywoods Busy Girl