भिडे मास्तरांची लेक बिकीनीत ; व्हिडिओ व्हायरल

Tarak mehata ka ulta chasma actress nidhi bhanushali bikini video viral
Tarak mehata ka ulta chasma actress nidhi bhanushali bikini video viral

मुंबई - कलाकार मग तो छोट्य़ा पडद्यावरील असो वा मोठ्या पडद्यावरील त्यांना आपल्या प्रसिध्दीचा मोह काही केल्या आवरत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात चर्चेत राहण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवताना दिसतात. हल्ली टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार सोशल मीडियाचा वापर स्वताच्या पीआरसाठी करताना दिसून आले आहेत. यानिमित्तानं चाहत्यांच्या संपर्कातही राहता येते आणि आपण लाईमलाईट मध्येही राहतो. असे फिलिंग त्यांना येते.

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका कमालीची लोकप्रिय आहे, सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असणारी मालिका म्हणूनही तारक मेहताचे नाव घ्यावे लागेल. या मालिकेतील कलाकार निधी भानुशाली म्हणजेज भिडे मास्तरांच्या लेकीचा बिकीनी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती तिच्या पाळीव कुत्र्यासोबत पोहताना दिसत आहे. ज्यावेळी तिनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र तिनं त्याची पर्वा न करता चाहत्यांच्या कमेंटसला धन्यवाद दिले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मलिकेतील अनेक कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये जेठालाल, दयाभाभी, माधवी भाभी, टप्पू किंवा सोनू या कलाकारांची चर्चा होत असते.   काही दिवसांपासून भिडे मास्तरांची लेक सोनू म्हणजेच निधी भानुशाली फॉर्म मध्ये आहे. सध्या निधी तिची सुट्टी एन्जॉय करत असून अलिकडेच तिने स्विमिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत निधीने तिचे व्हेकेशनमधील काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती बिकीनीमध्ये दिसत असून समुद्रात पोहताना दिसत आहे. केवळ निधीच नाही तर यावेळी तिचे काही मित्र-मैत्रिणी आणि पाळीव श्वानदेखील समुद्रात पोहताना दिसून येत आहे.

निधीचा हा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर हीट झाला आहे.  1 लाखांहून अधिक  लाइक्स मिळाले आहेत. तर कमेंट्सचा त्यावर पाऊस पडत आहे. निधी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सोनू ही भूमिका साकारली होती. तिनं सहा वर्ष तिनं या मालिकेत काम केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com