TDM Movie: आता जाळ अन् धूर संगच.. 'या' दिवशी पुन्हा रिलीज होतोय भाऊराव कऱ्हाडेंचा 'टिडीएम'.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tdm marathi movie new release date announced by director bhaurao karhade

TDM Movie: आता जाळ अन् धूर संगच.. 'या' दिवशी पुन्हा रिलीज होतोय भाऊराव कऱ्हाडेंचा 'टिडीएम'..

TDM ,marathi movie new release date: 'TDM'च्या चाहत्यांसाठी एक प्रचंड आनंदाची बातमी आहे. गेली काही दिवस प्रचंड चर्चेत असलेला 'टिडिएम' आता लवकरच पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं नाईलाजानं चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं लागलं होतं.

(tdm marathi movie new release date announced by director bhaurao karhade )

यामुळे प्रेक्षकांची मोठी निराशा झालीच शिवाय याबाबत बोलताना दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे भावुक झाले. चित्रपटाला एवढी मेहनत घेऊनही केवळ चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्याने चित्रपट बाहेर काढावा लागला म्हणून कलाकार अक्षरशः धायमोकळून रडले होते.

त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं. पुण्यात या चित्रपटाच्या समर्थनार्थ चक्क भव्य मोर्चा काढला होता. अगदी लोकांनी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून मोहिमच हातात घेतली. अगदी सरकार दरबारीही त्याची दखल घ्यावी लागली. अखेर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.

संदर्भात भाऊराव कऱ्हाडे म्हणतात, ''नमस्कार रसिकप्रेक्षकहो,
#ISupportTDM मोहीम उत्स्फुर्त पणे राबवून आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.''
''आपल्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळाली आहे आणि याच उमेदीने आम्ही 'टीडीएम' चित्रपट पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत...''
'''टीडीएम' च्या प्रवासाला पुन्हा सुरवात होत आहे ... ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात '#टीडीएम' प्रदर्शित होत आहे. आपल्या सर्वांचे उदंड प्रेम मिळेल याची खात्री आहे...
तेव्हा भेटूया थेटरात... ९ जून ला...'' या पोस्टनंतर आता चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सर्वजण आता 9 जून रोजी वाट पाहत आहेत.

टॅग्स :Marathi Movies