'पानिपत'च्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

'हर हर महादेव'चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज.... मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् सर्वत्र या सिनेमाविषयी चर्चा, त्याचे कौतुक झाले आणि चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता अनेकांनी दर्शवली

पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना 6 डिसेंबरला अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं.

'पानिपत' की 'तानाजी', कोणती लढाई घडविणार इतिहास?

'हर हर महादेव'चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज.... मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् सर्वत्र या सिनेमाविषयी चर्चा, त्याचे कौतुक झाले आणि चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता अनेकांनी दर्शवली. 'मराठा... भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.' असं म्हणत चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते आणि आपण प्रत्येक दृश्यागणिक जणू पानिपतच्या रणभूमीत हजर झालो आहोत असा आभास निर्माण केला जातो. ट्रेलरनंतर या सिनेमातील कलाकार, गाणी एक-एक करुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. 

Image

ज्या युध्दाची गोष्ट वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचली ते युध्द आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारवाडा असलेल्या पुणे शहराला ‘पानिपत’च्या कलाकारांनी भेट दिली. यावेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, कलाकार अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, गश्मीर महाजनी, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनिश बहल, अजय-अतुल उपस्थित होते. यावेळी चित्रपटाविषयीची चर्चा, शूट दरम्यानचे काही किस्से उलगडत गेले आणि कलाकार आणि पत्रकार यांच्यामधील संवाद रंगत गेला.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसणार आहे तर अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका संजय दत्त यांनी साकारली आहे. तसेच, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे. 

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं ज्या युद्धाचं वर्णन केलं जातं त्या ‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धाचा थरार ६ डिसेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की पाहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team of Panipat visit at Pune