Mothers Day Special : मराठी अभिनेत्री जेव्हा 'आई' विषयी सांगतात...

मातृदिनानिमित्त आई विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Mothers day Special
Mothers day SpecialTeam esakal

मुंबई- प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. मराठी मालिकांमधील अभिनेत्रींने मातृदिनानिमित्त त्यांच्या आई विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने तिच्या आईविषयी सांगितले, ‘माझ्या आईचं बालपण गावाकडे गेलं. तिचं लग्नही खूप लवकर झालं. त्यामुळे तिला फार शिकता आलं नाही. पण तिचा उत्साह खूप दांडगा आहे. तिला कुकिंगची आवड आहे. त्यामुळे युट्युबवर पाहून ती वेगवेगळे पदार्थ बनवते. लॉकडाऊनच्या काळात तर आईने मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट बनवून दिली. माझी आई अन्नपूर्णाच आहे असं म्हणायला हवं.’

Mothers day special
Mothers day specialTeam esakal
Mothers day special
Mothers day specialTeam esakal

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेत श्वेताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भगरेने तिच्या आईविषयी सांगितले, ‘माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. माझी आई शिक्षिका आहे. तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र तिची शिक्षणाची आवड मात्र तिने कायम जपली. यावर्षीच तिने पत्रकारितेचं शिक्षणही पूर्ण केलं. यावयातही तिचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.’

Mothers day special
Mothers day specialTeam esakal

दिव्या पुगावकर म्हणजेच स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील माऊ तिच्या आईविषयी सांगितले , ‘माझं आणि माझ्या आईचं नातं अगदी जिवलग मैत्रीणींप्रमाणेच आहे. आम्ही खूप जास्त घट्ट मैत्रीणी आहोत. मी कोणतीच गोष्ट आईपासून लपवून ठेवत नाही. तिला पाहिलं की आपसुकच माझ्या तोंडून एक एक गोष्ट बाहेर पडायला लागते. आणि हेच माझ्या आईच्या बाबतीतही आहे. माझी आई देखिल कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. आम्हा दोघींची एकमेकींना साथसोबत आहे.

Mothers day Special
अख्तर बोलले, ट्रोल झाले, 'सरकारचं कौतूक पडलं महागात'
Mothers day Special
ऐकावं ते नवल, 'अमिताभ', 'डोनाल्ड ट्रंम्पच्या' नावानं 'इ - पास'

माझी आई गृहिणी आहे. तिला क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडतात. तिची कलात्मकता अगदी स्वयंपाकापासून ते अगदी घरातल्या सजावटीच्या वस्तून बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत डोकावत असते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला फार आवडतात. माझा स्वभाव आईच्या पूर्णपणे वेगळा आहे. माझी आईला कोणतीही गोष्ट खटकली तर ती तिथल्या तिथे बोलून मोकळी होते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com