'टेलिव्हिजन क्वीन' एकता कपूरला कोरोना

बॉलीवूडमध्ये (bollywood) कोरोनाचा धुमाकूळ, एकापाठोपाठ वेगवेगळ्या सेलिब्रेटींना (bollywood celebrity) कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
Ekta kapoor
Ekta kapoor

बॉलीवूडमध्ये (bollywood) कोरोनाचा धुमाकूळ, एकापाठोपाठ वेगवेगळ्या सेलिब्रेटींना (bollywood celebrity) कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (bollywood actress kareena kapoor) आणि अमृता अरोरा यांच्यासह आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्या निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (bmc) करिनाचं घर सील केलं होतं. ती घरातच क्वॉरनटाईन झाली होती. आता टेलिव्हिजन क्षेत्रातील क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.

एकतानं (Ekta Kapoor) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेयर करुन याबाबत अधिक माहिती दिली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचे दिसून आले होते. दोन वर्षात कोरोनानं घातलेल्या थैमानामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांचे निधन झाले. आताही कोरोनानं कहर केला असून देशभरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याच्या कुटूंबाला कोरोना झाला होता. त्यानंतर निर्माती, दिग्दर्शक एकता कपूरलाही कोरोना झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Ekta kapoor
Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'

एकता कपूरनं शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेशी काळजी घेऊन देखील मला कोरोना झाला आहे. मी आता बरी आहे. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता आणि त्याच्या अकरा महिन्याच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर आज सकाळी प्रख्यात अभिनेता जॉन अब्राहमला देखील कोरोनानं ग्रासल्याची बातमी समोर आली होती. आतापर्यत सीमा खान, करिना कपूर, अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर यांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. राज्यामध्ये गेल्या २४ तासांत ८ हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

Ekta kapoor
Happy Birthday Kareena : जाणून घ्या तिच्याविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्टस्

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com