Sudheer Varma Death: साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का; तेलुगू अभिनेता सुधीर वर्मांच्या आत्महत्येने खळबळ

तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा यांनी विशाखापट्टणम येथील आपल्या राहत्या घरी जीवन संपवले
Sudheer Varma Death
Sudheer Varma DeathEsakal

Sudheer Varma Death: तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा यांनी विशाखापट्टणम येथील आपल्या राहत्या घरी जीवन संपवले. त्यांच्या या निर्णयाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैयक्तिक कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सुधीर यांच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा परसली आहे.

सुधीर वर्मा यांच्यासोबत ‘कुंदनपू बोम्मा’ चित्रपटात काम केलेले त्यांचे सहकलाकार सुधाकर कोमकुला यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यांनी यासंबधीचे ट्विट करत माहिती दिली आहे, “तुम्हाला भेटून आणि तुमच्यासोबत काम करताना आनंद झाला! तुम्ही आता आमच्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे” असं त्यांनी ट्विटमद्धे लिहालं आहे.

Sudheer Varma Death
Rakhi Sawant: राखी सावंतने केला जामिनासाठी अपील, मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय

सुधीर यांच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांनी अचानक हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते, असे सांगण्यात आले आहे.

अभिनेता सुधीर वर्मा यांनी 2013 मध्ये 'स्वामी रा रा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर 2016 मध्ये कुंदनपू बोम्मा या चित्रपटात ते दिसले होते.

या चित्रपटातून सुधीर वर्मा यांनी खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या काही दिवसांपासुन काम न मिळाल्याने ते डिप्रेशनमध्ये होते.

Sudheer Varma Death
Athiya-Rahul च्या लग्नानंतर जावयासाठी हे काय बोलून गेला सुनिल शेट्टी..व्हिडीओ व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com