दहा पिढ्या बसून खातील, RRR चा एनटीआर अब्जोपती Jr NTR Birthday Net Worth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jr NTR Net Worth

Jr NTR Birthday Net Worth: दहा पिढ्या बसून खातील, RRR चा एनटीआर अब्जोपती

Jr NTR Net Worth: साऊथचा सुपरस्टार नंदामुरी तारका रामाराव ज्युनियर म्हणजेच ज्युनियर एनटीआर तो सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. साऊथचा हा सुपरस्टार त्याच्या नुकताच प्रदर्शित झालेला RRR झाल्यापासून चर्चेत आहे. ज्युनियर एनटीआर हा केवळ साऊथ पुरताच मर्यादित राहिलेला नसून तो आता जगभर लोकप्रिय झाला आहे.

आज ज्युनियर एनटीआर त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त एनटीआरच्या चाहत्यांना त्याची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे सुमारे 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्युनियर एनटीआर हा साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

ज्युनियर एनटीआर यांनं वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी 'ब्रह्मर्षी विश्वामित्र' चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. ज्युनियर एनटीआरने अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी नंदी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट तेलुगू पुरस्कार जिंकले आहेत.

एनटीआर हा खुप विलासी जीवन जगतो. हैदराबादच्या प्राइम लोकेशनमध्ये त्यांचा एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 25 कोटी रुपये आहे.

ज्युनियर एनटीआर त्याच्या कुटुंबासह हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये एका आलिशान घरात राहतो. या घरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआरकडे सुमारे 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय अभिनेत्याकडे बेंगळुरू आणि कर्नाटकमध्ये आलिशान घरे आहेत. तो एका महिन्यात 3 कोटी रुपये आणि वर्षभरात 36 कोटी रुपये कमावतो.

ज्यूनियर NTR कडे लक्झरी कार कलेक्शनही आहे. त्याच्याकडे रोल्स रेंज रोव्हर सारखी वाहने आहेत. NTR चा लकी नंबर नऊ आहे. त्यामुळे तो त्याच्या सर्व गाड्यामध्ये नऊ नंबर असलेल्या नंबर प्लेट वापरतो.

Jr NTR ने त्याच्या BMW कारच्या नोंदणीसाठी फॅन्सी नंबर 9999 साठी 11 लाखां रुपये मोजले. ज्युनियर एनटीआर दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी तो 20 ते 25 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो जाहिरातींमधून लाखोंची कमाई करतो.

साऊथ सुपरस्टारची फॅन फॉलोइंग जगभरात आहे आणि तो युथ आयकॉन आहे. अभिनेता लेनकॉम फेसवॉश, गुच्ची रश, कॉम्फे मेट कोकोनट यासह अनेक ब्रँड्स इंडोर्स करतो. ज्युनियर एनटीआर एका जाहिरातीसाठी सुमारे 1.5 कोटी रुपये आकारतो.