दीपवीर यांच्या विवाहसोहळ्याबद्दल 'या' आहेत काही खास गोष्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

विवाहाला उपस्थित पाहुणेमंडळी ते या सोहळ्यासाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांच्या मोबाईल कॅमेराला स्टिकर्स लावण्यात आले आहेत. 

मुंबई: बॉलिवूडच्या रामलीलाची प्रेमकहाणी तर खूप गाजली. इतकी की या हॉट जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रेमकहाणी प्रमाणेच दीप-वीर यांच्या लग्नाच्या चर्चाही गेल्या वर्षभरापासून रंगत होत्या. अखेर काल (ता. 14) इटलीतील लेक कोमो येथे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी विवाहबंधनात अडकली. या विवाहसोहळ्याबाबत दोन्ही कुटूंबाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अगदी राजेशाही ताटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याबद्दल काही विशेष गोष्टी ज्या चाहत्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल...

 • दीपवीरचा विवाह 14 आणि 15 नोव्हेंबर असे दोन दिवस पार पडेल असे त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या लग्नपत्रिकेत दिले गेले होते. दोन दिवस विवाह कसा असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण 14 तारखेला दीपिका च्या कुटुंबातील परंपरेप्रमाणे कोंकणी ब्राह्मण पध्दतीने तर 15 तारखेला रणवीर च्या कुटुंबातील परंपरेप्रमाणे सिंधी पध्दतीने पार पडण्याचे ठरले आहे. काल कोंकणी पद्धतीने विवाह सोहळा झाला तर आज सिंधी पद्धतीने विवाह सोहळा पार पडेल.
 • हा विवाहसोहळा फार खासगी पद्धतीने पार पडत आहे. 13 तारखेला दीपवीर यांचा साखरपुडा पार पडला आणि काल कोंकणी पद्धतीने विवाह झाला असला तरी या कार्यक्रमांचा एकही अधिकृत फोटो आलेला नाही.
 • या संपूर्ण सोहळ्यात कुणीही कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढू नये याची खास दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी विवाहाला उपस्थित पाहुणेमंडळी ते या सोहळ्यासाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांच्या मोबाईल कॅमेराला स्टिकर्स लावण्यात आले आहेत. 
 • लग्नाच्या आधीच आठवड्याभरापासून ते आतापर्यंत कडेकोड सुरक्षा बंदोबस्त विवाहसोहळा परिसरात करण्यात आला आहे. पर्यटकांसह अनेकांना या परिसरातून दूर ठेवण्याचा प्रयत्न येथील सुरक्षारक्षक करत आहेत. सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी दीपवीर या जोडीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तब्बल एक कोटींपेक्षा अधिक खर्च सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.
 • लेक कोमो येथील ज्या व्हिलामध्ये हा विवाहसोहळा पार पडत आहे तो व्हिला दी बाल्बिआनेओ पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या परिसरात अन्य कुणी येऊ नये यासाठी व्हिलाला बोटीनं गस्त घालण्यात आली आहे. 
 • कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक पाहुण्याला विशेष रिस्ट बँड आणि विशिष्ट कोड असलेला इ-पासही  देण्यात आले आहे. 
 • दीपवीरने सुरक्षा व्यवस्थेबरोबरच विवाहसोहळ्यातील खाण्याच्या मेन्यूबद्दलही खास काळजी घेतली आहे. एक खास करारच या जोडीने शेफ बरोबर केला आहे. या करारानुसार, शेफने या विवाहसोहळ्यासाठी बनवण्यात येणारे पदार्थ पुन्हा कुठेच बनवण्यात येणार नाही.
 • काल कोंकणी पद्धतीने विवाह पार पडल्यानंतर दीपवीर लेक कोमो परिसरातील कास्टदिवा रिसॉर्टमध्ये परतले. विवाह पार पडला तो व्हिला ते रिसॉर्ट हे अंतर पार करण्यासाठी एक खास विंटेज बोटीची सोय करण्यात आली आहे. या आलिशान बोटीचा खर्च साधारण चार कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते. 
 • आज पार पडणाऱ्या विवाहसोहळ्यात रणवीर सी प्लेनमधून ग्रँड एंण्ट्री करणार असल्याचं समजतंय. 
 • मंगळवारी (ता. 13) दीपवीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आलं होतं. रणवीरनेही दीपिकासाठी गाणं गायल्याचं सांगितलं जातयं. 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँड ह्यात या आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. 

  deepveer

deepveer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten important things about deepika padukone and ranveer singhs wedding