'ठाकरे' कमाईच्या बाबतीतही 'बाप'रे

वृत्तसंस्था
रविवार, 27 जानेवारी 2019

ठाकरे या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब यांची भूमिका वठविली आहे. तर अमृता रावने माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. ठाकरेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची होती त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी दिवसात 07 ते 08 कोटी रुपयांची कमाई करणार असा सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षाही अधिक म्हणजेच एकूण 16 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

मुंबई- मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली. कंगना रणावतच्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या ठाकरेने पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.

20 कोटी रुपये खर्च करुन खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळली आहे. बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 06 कोटी तर दुसऱ्या दिवशी 10 कोटी रुपयांची अशी मिळून एकूण 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही ट्विट करत माहिती दिली आहे.

ठाकरे या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब यांची भूमिका वठविली आहे. तर अमृता रावने माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. ठाकरेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची होती त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी दिवसात 07 ते 08 कोटी रुपयांची कमाई करणार असा सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अंदाजापेक्षाही अधिक म्हणजेच एकूण 16 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray Opening Day Box Office Report Nawazuddin Siddiqui