ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार 'मास्टर'; कधी माहितीये?

thalapathy Vijay and setupati Vijay master digital premiere on 29th January amazon prime ott platform
thalapathy Vijay and setupati Vijay master digital premiere on 29th January amazon prime ott platform

मुंबई - प्रसिध्द अभिनेता थलापती विजय आणि विजय सेतूपती यांच्या मास्टर नावाच्या चित्रपटानं गेल्या दोन आठवड्यांपासुन बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 13 जानेवारीला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मास्टर पाहण्यासाठी चित्रपटगृहांच्या बाहेर प्रेक्षकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. या चित्रपटानं केवळ भारतातच नव्हे तर जगातील काही शहरांमध्येही चांगली कमाई केली आहे.

मास्टरच्या निर्मात्यांनी आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्याप्रमाणे अॅमेझॉन प्राईमवर तो प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन प्रदर्शित झालेल्या मास्टरनं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या तिस-याच दिवशी या चित्रपटानं 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यानंतर आता हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 जानेवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती प्रसिध्द केली आहे. त्यांनी असे लिहिले आहे की. 13 जानेवारीला प्रदर्शित झालेला मास्टर चित्रपटाचा 29 जानेवारीला अॅमेझॉन प्राईमवर डिजिटल प्रीमिअर होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

याबाबत अधिक माहिती देताना अॅमेझॉन प्राईमचे भारतातील प्रमुख म्हणाले की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी मास्टर हा सिनेमा महत्वाची भूमिका बजावतो आहे, त्याने केलेली कमाई प्रचंड आहे. यावर्षीची सुरुवात चांगली झाली आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की मास्टर अॅमेझॉन प्राईमवर प्रसिध्द होतो आहे.  मास्टर हा असा एकमेव चित्रपट आहे जो लॉकडाऊननंतर एवढ्या प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला आहे. एक दिवशी त्यानं 40 कोटींची कमाई केली आहे. तामिळनाडूमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला आहे. हा चित्रपट बाहुबली - द कनक्लुझन, साहो, आणि कबालीसारख्या चित्रपटांना मास्टर टक्कर देत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com