Bigg Boss 16: फराह खानच्या घरी दणक्यात रंगली बिग बॉस पार्टी.. पार्टीत चर्चा फक्त शिव आणि निम्रीतची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare, Nimrit Kaur, Bigg Boss 16, bigg boss 16 party

Bigg Boss 16: फराह खानच्या घरी दणक्यात रंगली बिग बॉस पार्टी.. पार्टीत चर्चा फक्त शिव आणि निम्रीतची

Bigg Boss 16 Party: बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले नुकतीच झाली. या ग्रँड फिनालेमध्ये एम.सी.स्टॅनने बाजी मारली. बिग बॉसचा यंदाचा १६ वा सिझन प्रचंड लोकप्रिय झाला. बिग बॉस १३ व्या सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला सहभागी होता. तो सिझन हिट झाला.

त्या सीझननंतर बिग बॉसचा १६ वा सिझन तुफान हिट झाला. बिग बॉस १६ मधले सगळेच स्पर्धक लय भारी होते. बिग बॉसच्या याच स्पर्धकांसाठी फराह खानने खास पार्टी आयोजित केली होती.

फराह खानने तिच्या घरी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तिचा भाऊ आणि बिग बॉस मधला स्पर्धक साजिद खान होताच. शिवाय बिग बॉसमधले सर्व स्पर्धक सहभागी होते.

पार्टीत सुद्धा मंडलीची जोरदार चर्चा होती. सगळ्यांनी एकदम मॉडर्न लूक करून पार्टीत एंट्री केली. सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणेज शिव ठाकरे आणि निम्रीत कौर या दोघांची.

शिव ठाकरे आणि निम्रीत पार्टीत एकमेकांसोबत होते. दोघांनी एकमेकांसोबत खास फोटोशूट सुद्धा केलं होतं. निम्रीतने खास हिरव्या रंगाचा वन पीस परिधान केलेला तर शिवने गुलाबी रंगाचा सूट आणि आत पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला.

शिव आणि निम्रीतची जोडी या पार्टीत एकमेकांना शोभून दिसत होती. पार्टीत स्टॅन, साजिद, अब्दू, शिव आणि निम्रीत या मंडलींनी एकमेकांसोबत आणि इतरांसोबत धम्माल केली.

बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले काल पार पाडली. ग्रँड फिनालेची ट्रॉफी एम. सी. स्टॅनने जिंकली. एम. सी. स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये आणि हुंडाई गाडी बक्षीस स्वरूपात मिळाली. एम.सी. स्टॅन विजेता झाला तर बिग बॉस १६च्या ग्रँड फिनालेमध्ये मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता ठरला.

टॅग्स :Big BossShiv Thakare