Guneet Monga: ऑस्कर मिळाला आणि लगेच गुनीत मोंगांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लगलं, एम एम किरवानी यांचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guneet gonga, 'The Elephant Whisperers', Natu Natu, RRR, MM Keerawani

Guneet Monga: ऑस्कर मिळाला आणि लगेच गुनीत मोंगांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लगलं, एम एम किरवानी यांचा मोठा खुलासा

Guneet Gonga News: जगाचे लक्ष लागलेला 'ऑस्कर' सोहळा काहीच दिवसांपूर्वी पार पडला. या सोहळ्यात भारताने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

यामध्ये 'RRR' चित्रपटाच्या Natu Natu गाण्याला आणि 'The Elephant Whisperers' या डॉक्युमेंटरीला ऑस्कर मिळाला. या विजयाने भारताची मान चांगलीच उंचावली. भारतीयांनी मोठा जल्लोष केला.

पण या आनंदाला काहीसं गालबोट लागलं जेव्हा The Elephant Whisperers डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या गुनित मोंगांना ऑस्कर मिळाल्यानंतर लगेच हॉस्पटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली होती. काय घडलं होतं नेमकं जाणून घेऊया...

(The Elephant Whisperers After winning Oscar guneet gonga admitted in hospital mm keervani revealed)

अलीकडेच ऑस्कर जिंकल्यानंतर 'RRR' चित्रपटाचे संगीतकार MM Keerawani यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

या मुलाखतीत, MM Keerawani यांना ऑस्कर 2023 मध्ये ऑस्कर विजेत्या निर्माती गुनीत मोंगा यांचं भाषण थांबवण्यात आलं त्या प्रकरणाबद्दल खुलासा केला.

कीरवानी यांनी म्हटले आहे.. ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MM Keerawani पुढे म्हणाले, "विजयानंतर गुनीत मोंगा यांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांचा श्वास कोंडायला लागला आणि गुनीत यांची तब्येत अचानक बिघडली.

पुढे गुनीत मोंगा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले." अशाप्रकारे एमएम कीरावानी यांनी 'द एलिफंट व्हिस्पर्स'साठी ऑस्कर जिंकणारा निर्माता गुनीत मोंगा यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

ऑस्कर-2023 (Oscar 2023) या सोहळ्यात 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीमध्ये हत्ती आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या दाम्पत्याची गोष्ट सांगण्यात आली आहे.

या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनी केली असून दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केलं आहे.

कार्तिकी आणि गुनीत यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर जाऊन ऑस्करची ट्रॉफी स्विकारली. यावेळी दोन महिलांनी हा ऑस्कर जिंकला असेही त्यांचे कौतुक केले गेले. परंतु बोलायला वेळ न दिल्याने गुनीत मोंगा नाराज दिसल्या