द फॅमिली मॅन 2 ; उद्या होणार प्रदर्शित, कधी, कुठे, केव्हा पाहाल?

मनोज वाजपेयीनं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे.
the family man 2
the family man 2Team esakal

मुंबई - बहुचर्चित, बहुप्रतिक्षेत असणारी द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन (the family man 2) उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक या मालिकेच्या दुस-या सीझनची वाट पाहत होते. आतापर्यत अनेकदा त्याच्या प्रदर्शनावरुन वाद झाला होता. तांडव नावाची मालिका त्यावेळी प्रदर्शित झाली होती. त्याच दरम्यान फॅमिली मॅनचा सीझनही प्रदर्शित होणार होता. मात्र तो तांडवच्या (Tandav) वादामुळे प्रदर्शित झाला नाही. अखेर प्रेक्षकांना उद्या या मालिकेचा दुसरा भाग पाहायला मिळणार आहे. (the family man 2 premiere release date amazon prime video june 4 manoj bajpayee samantha akkineni priyamani)

मनोज वाजपेयीनं (Manoj bajpayee) या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. फॅमिली मॅन वेबसीरिजचे दिग्दर्शन राज - डीके (Raj and dk) यांनी केले आहे. त्यात समंथा, प्रियमणि, शरद केळकर यांच्याही भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. या मालिकेत काम करणारे आणखी एक ज्येष्ठ अभिनेते आसिफ यांनी आत्महत्या केली.

द फॅमिली मॅनच्या पहिल्या भागाला जोरदार रिस्पॉन्स मिळाला होता. त्याचा दुसरा सीझन यायला उशीर झाला आहे. यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. दोन ते तीनवेळा त्याच्या तारखांमध्ये बदल झाला होता. अखेर 4 जूनला मध्यरात्री 12 वाजता, अॅमेझॉन प्राईमवरुन ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

the family man 2
संजनाचा अंकितावर आरोप; पाहा व्हिडिओ
the family man 2
अभिनेत्रीचा मॉर्फ्ड अडल्ट व्हिडीओ व्हायरल; तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वी या मालिकेचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या सीरिजचे निर्माता आणि दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सांगितले की, प्रेक्षकांप्रमाणेच आम्हालाही फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनची प्रतिक्षा होती. त्याच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह आणखी वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com