ठरलं! 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Sarsenapati Hambirrao Movie
Sarsenapati Hambirrao Movieesakal
Summary

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासनं प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचं जाहीर कौतुक केलं होतं.

Sarsenapati Hambirrao Movie : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Vitthal Tarde) यांचा आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. 27 मे रोजी हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपलीय. खुद्द लेखक-दिग्दर्शक तरडे यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलीय.

Sarsenapati Hambirrao Movie
The Kashmir Files: बत्तीस वर्षांपासून दाटलेल्या हुंदक्याला वाट मिळाली

या चित्रपटात मराठीतील अभिनेता गश्मीर महाजनी (Actor Gashmeer Mahajani) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहेत. याशिवाय, अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या टीझरला ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली होती. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Actor Prabhas) यानं प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचं जाहीर कौतुक केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com