Vivek Agnihotri: 'अशा गुंडांची घरे बुलडोझरने पाडली पाहिजेत',विवेक अग्निहोत्री भडकला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri: 'अशा गुंडांची घरे बुलडोझरने पाडली पाहिजेत',विवेक अग्निहोत्री भडकला..

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी सर्वाधिक चर्चेतील आणि वादग्रस्त चित्रपट म्हणून ज्याकडे पाहिले गेल्या त्या द काश्मीर फाईल्सला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

विवेक अग्निहोत्री अजूनही या चित्रपटाबद्दल बोलतं असतात. अग्निहोत्री हे त्यांच्या राजकीय, सामाजिक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. एका पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्रीने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

विवेक अग्निहोत्री अजूनही या चित्रपटाबद्दल बोलतं असतात. अग्निहोत्री हे त्यांच्या राजकीय, सामाजिक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. एका पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्रीने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

यात त्यांनी शाहरुख खानचं कौतुक केलं. मात्र यासोबतच चित्रपटाच्या निषेधार्थ चित्रपटगृहांमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

यावेळी तो म्हणाला, “आम्ही एअर होस्टेसला शिव्या देतो. पायलटला मारहाण करतो. जो दिसतो त्याला मारहान करतो… थिएटर जाळणे आणि तोडफोड करणे हा मोठा गुन्हा असावा… पण कुणाला काही होत नाही. थिएटरमध्ये जा आणि ते फोडा, जाळून टाका, पोस्टर्स फाडून टाका, मॅनेजरला मारहाण करा, मॅनेजरला का मारताय?

विवेक अग्निहोत्री यांनी विचारले की पार्किंग आणि पान विक्रेत्यांना मारहाण का केली जाते? त्यांचा काय दोष. तो म्हणाला, “ही गुंडगिरी आहे. याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. मी केंद्र सरकार आणि सर्व सरकारांबद्दल दुःखी आहे. अशा प्रश्नांवर गप्प बसू नये, अशी माझी केंद्र सरकारकडे नेहमीच तक्रार असते.'

'दोन-तीन महिन्यांनी तुम्ही त्याच्या विरोधात काही बोललात तर त्याचा काही अर्थ नाही… मी म्हणतो, काही होतं नसेल तर त्या लोकांच्या घरावर बुलडोझर पाठवा, जर तुम्ही एक तोडलं तर ते तुमचं पूर्ण घरच फोडतील.'

टॅग्स :vivek agnihotri