esakal | 'आमच्यातलं भांडण संपलं, एकत्र काम करणार', पुन्हा झळकणार ती जोडी
sakal

बोलून बातमी शोधा

'आमच्यातलं भांडण संपलं, एकत्र काम करणार'

'आमच्यातलं भांडण संपलं, एकत्र काम करणार'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भलेही ते दोन्ही कलाकार सुरुवातीला एकत्रित काम करत होते मात्र कालांतरानं त्यांच्यात वाद झाले. एकमेकांवर त्यांनी टोकाच्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र त्यामुळे ते जे शो साठी एकत्र आले होते त्याच्या टीआरपीवरही त्याचा परिणाम झाला होता. चाहत्यांनीही त्यांच्या या भांडणामुळे नाराजी व्यक्त केली होती. ज्या दोन्ही विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं त्या कलाकारांची ताटातूट चाहत्यांना पाहवत नव्हती. यापूर्वी या दोन्ही कलाकारांनी आपण पुन्हा कधीच एकत्र काम करणार नाही असं सांगितलं होतं. त्यातल्या एका कलाकारानं तर काही झालं तरी चालेल पण पुन्हा त्याच्या शो मध्ये काम करणार नाही. असा आक्रमक पवित्राही घेतला होता. आता तेच दोन्ही विनोदी कलाकार पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार झाले आहेत.

आपण बोलत आहोत कपिल शर्मा शो (the kapil sharma commedy show) या कॉमेडी कार्यक्रमातील कपिल शर्मा (kapil sharma) आणि सुनील ग्रोव्हर (sunil grover) यांच्याविषयी. या दोन्ही कलाकारांनी आपल्या हजरजबाबीपणामुळे आणि अभियनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी सुनील ग्रोव्हरनं सनफ्लॉवर नावाच्या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकाही साकारली होती. तांडव नावाच्या वेबसीरिजमधून त्यानं ओटीटी विश्वात पाऊल ठेवलं. दुसरीकडे कपिल शर्मानंही बॉलीवूडमध्ये एका चित्रपटातून पदार्पण केल्याचे दिसुन आले आहे. या दोघांमध्ये वैयक्तिक कारणास्तव वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आपण एकत्रित काम करणार नाही. असा निर्णय त्यांनी घेतला होता. आता आपण कपिलसोबत काम करायला तयार आहे. त्याविषयी सुनीलनं सांगितलं, मला जर चांगली कॉन्सेप्ट मिळाली तर मी कपिलसोबत काम करायला तयार आहे. त्याच्यात आणि माझ्यात जरी वाद झाले असले तरी आमच्यातील अनेक चांगल्या आठवणीही आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांना एकत्रित टीव्हीच्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. या दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांचा अभिनय, त्यांचं विनोदातील टायमिंग हे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या दोघांमध्ये 2017 मध्ये वाद निर्माण झाला. डॉ.मशहूर गुलाटीची भूमिका त्या शो मध्ये सुनीलनं प्रभावीपणे साकारली. सुनील हा एका पुरस्कार सोहळ्यामध्ये गेला होता. तेव्हा त्याला पुन्हा कपिलसोबत काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं आपल्याला एखादी योग्य भूमिका जर मिळाली तर त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. असं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा: कपिल शर्मासोबत पुन्हा झळकणार सुनील ग्रोव्हर?

हेही वाचा: 'जुने चेहरे, नवी सुरुवात'; 'द कपिल शर्मा शो' पुन्हा येतोय

loading image
go to top