'बाबा तुम्ही बाईची भूमिका करता हे मला आवडत नाही'

त्याशिवाय त्याची दूसरी भूमिकाही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे.
actor sunil grover
actor sunil grover Team esakal

मुंबई - द कपिल शर्मा शो (the kapil sharma) च्या निमित्तानं लोकप्रिय झालेल्या सुनील ग्रोव्हरचा संघर्ष मोठा आहे. गेल्या काही दिवसांत त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. जेव्हापासून त्याचे आणि कपिलच्या संबंधामध्ये कटूता आली तेव्हापासून सुनीलचे करिअर वेगानं पुढे सरकताना दिसत आहे. सुनीलनं आतापर्यत दोन वेबसिरीजमध्ये (web serise) काम केले आहे. चाहत्यांना त्याचे काम आवडले आहे. कॉमेडी शो मध्ये सुनीलची भूमिका चाहत्यांना पसंत होतीच. त्याशिवाय त्याची दूसरी भूमिकाही अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. (the kapil sharma show the reason why sunil grover not returned to show)

सुनील (sunil grover) आता चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्यानं त्याच्या मुलाची आपल्या बद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा आपल्या भूमिकेबद्दल कशाप्रकारे विचार करतो हे सांगताना सुनील कमालीचा भावनिक झाला आहे. त्यानं सांगितलय, आपण जेव्हा कपिलच्या त्या कॉमेडी शो मध्ये भूमिका करायचो तेव्हा त्यातील स्त्री व्यक्तिरेखा माझ्या मुलाला आवडत नव्हती. त्यानं त्यावरुन माझ्याशी अनेकदा वाद निर्माण झाला.

सुनील हा कपिल शर्मा शो मध्ये डॉ.मशहूर गुलाटी यांची भूमिका करताना दिसतो. याशिवाय गुत्थीची त्याची भूमिकाही सर्वांच्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यावरुन सुनीलच्या मुलानं त्याच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यावर सुनीलनं त्याला काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुनीलनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यानं आपल्या मुलाशी लाईव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधला.

actor sunil grover
सुख म्हणजे नक्की काय असतं: शिर्केपाटील कुटुंबाची वटपौर्णिमा

सुनीलचा मुलगा मोहन याला आपल्या वडिलांनी छोट्या पडद्यावर गुत्थी सारखी भूमिका करणे आवडत नाही. त्यानं वडिलांना अशा प्रकारच्या भूमिका करण्यासाठी विरोध केला आहे. ज्यावेळी तो आपल्या वडिलांना एखाद्या महिलेची भूमिका करताना पाहतो तेव्हा त्याचे मित्र त्याची टर उडवतात. असे तो सांगतो. सुनीलनं मोहनला सांगितले की, गुत्थीला सगळ्यांकडून प्रेम मिळते. त्या व्यक्तिरेखेचा अनादर करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com