
Anupam Kher : 'शेवटी लायकी...' अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांना खडसावलं! काय होतं कारण?
Anupam Kher: काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटानं देशभरामध्ये वेगळ्याच प्रकारचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. भलेही त्यांच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असेल. दुसरीकडे बॉलीवूमधील कित्येक सेलिब्रेटींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. सध्या अनुपम खेर आणि प्रकाश राज यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
प्रकाश राज यांनी काय म्हटले आहे..
केरळ चित्रपट फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या दरम्यान प्रकाश राज यांनी काश्मिर फाईल्सवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दिग्दर्शक प्रकाश राज यांची टिंगल टवाळी उडविण्याचे काम करण्यात आले होते. आता काश्मीर फाईल्स चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. तेव्हा प्रकाश राज म्हणाले होते की, द काश्मीर फाईल्स हा फालतू चित्रपट आहे. आम्हाला माहिती आहे की, तो कुणी प्रोड्युस केला आहे.
Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...
काश्मिर फाईल्सवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये काही परिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. दिग्दर्शकानं हा चित्रपट तयार करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. दिग्दर्शक खुशाल म्हणतो की, मला ऑस्कर का नाही मिळाला, आता यावर आपण काय बोलायचे, त्याला ऑस्कर कधीच मिळणार नाही. असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काही लोकांनी त्यांच्या लायकीनुसार वक्तव्य केले आहे. काहींना आयुष्यभर कुणीतरी सांगितल्यामुळे खोटं बोलावं लागतं. दुसरीकडे काही लोकं नेहमीच खरं बोलतात. मी त्यातला आहे. ज्यांना खोटं बोलून आयुष्य जगायचं असेल तर ती त्यांची मर्जी. हे सगळं करताना खेर यांनी भलेही प्रकाश राज यांचे नाव घेतले नसेल पण त्यांच्या बोलण्याचा रोख त्यांच्याकडेच होता हे दिसून आले आहे.
काश्मीर फाईल्सवर बोलण्याची प्रकाश राज यांची काही ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी त्याविषयी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मात्र खेर यांना काही त्यांचे बोलणे रुचलेले नाही. सोशल मीडियावर त्या दोघांमधील वाद हा समोर आला आहे. त्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. २०२२ मध्ये आलेल्या द काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांनी भूमिका केल्या आहेत.