काश्मीर फाईल्सचा विदेशात डंका, दिग्दर्शकाला थेट ब्रिटिश संसदेचं निमंत्रण|The Kashmir Files Director Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kashmir Files

काश्मीर फाईल्सचा विदेशात डंका, दिग्दर्शकाला थेट ब्रिटिश संसदेचं निमंत्रण

The Kashmir Files: सोशल मीडियावर अजुनही द काश्मीर फाईल्सचा फिव्हर आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काश्मीर फाईल्सनं सोशल मीडियावर वेगळीच वातावरण निर्मिती केली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित (Director Vivek Agnihotri) या चित्रपटानं (Bollywood Movies) मनोरंजन विश्वात तर खळबळ उडवून दिली आहेच याशिवाय देशातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील काश्मीर फाईल्सवर (entertainment news) परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट आता करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याची टीकाही सोशल मीडियावरुन काही नेटकऱ्यांनी केली आहे.

असं असलं तरी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरील कौतूकाचा वर्षाव काही केल्या थांबायला तयार नाही. त्यांना आता थेट ब्रिटिश संसदेतून (British parliment) काश्मीर फाईल्सच्या स्क्रिनिंगसाठीचं निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे सातासमुद्रापार काश्मीर फाईल्सची प्रसिद्धी झाल्याचे दिसून आले आहे. अकरा मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर त्याला मोठं यश मिळालं आहे. आतापर्यत काश्मीर फाईल्सनं 200 कोटींहून अधिक कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटिश संसदेनं विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना काश्मीरी पंडितांविषयी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

हेही वाचा: The Kashmir Files बाबतीत रणवीर सिंग चुकलाच;'दुबई एक्स्पो'त काय घडलं?

एका मुलाखतीच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्हाला आता ब्रिटिश संसदेनं निमंत्रित केलं आहे. एप्रिलमध्ये आम्ही त्याठिकाणी जाणार आहोत. काश्मीरी पंडितांवर जे अन्याय, अत्याचार झाले आहेत ते लोकांना कळावे यासाठी आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. आता आम्हाला एका गोष्टीचा आनंद होतो आहे की, आम्ही जो उद्देश ठेवला होता. त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: The Kashmir Files Director Vivek Agnihotri Invited British Parliament Issue Of Kashmiri Pandits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..