Kashmir Files: आक्रमक जमावाला चिन्मयने दाखवला छत्रपती शिवरायांवरील चित्रपट; वाचा किस्सा

चित्रपटात फारुख अहमद बिट्टा हा जेव्हा भारताच्या विरोधात घोषणा देतो तो सीन डेहराडून येथे शूट करण्यात आला होता.
Kashmir Files
Kashmir FilesSakal

मुंबई : सध्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. १९९० च्या दशकातील १९८९-९० मध्ये काश्मीरमधील पंडित आणि हिंदूवर झालेल्या आत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. पण सध्या देशभरातून एका बाजूला या चित्रपटावर टीका आणि एका बाजूला प्रेक्षक समर्थन करताना आपल्याला पहायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्री हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून शूटींग दरम्यानचा किस्सा त्यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे.

चित्रपटातल्या भारतविरोधी घोषणा आणि पंडितांवर मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेले अनन्वित आत्याचार यावरून बरेच लोकं सध्या याला विरोध करत आहेत. चित्रपटातील भारताविरोधी घोषणेचा हा सीन शूट करताना त्यावेळी स्थानिकांनी काहीकाळासाठी शूटींग रोखल्याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, चित्रपटात फारुख अहमद बिट्टा हा जेव्हा भारताच्या विरोधात घोषणा देतो तो सीन डेहराडून येथे शूट करण्यात आला होता.

चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटात बिट्टा याची भुमिका केली असून तो जेव्हा देशविरोधी घोषणा देत असतो तेव्हा त्याच्याबाजूला लोक असतात. शूटींगच्यावेळीसुद्धा तेथील स्थानिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांना या घोषणा ऐकायला आल्यावर त्यांनी काही काळ शूटींग बंद करायला लावलं होतं. त्यावेळी दिग्दर्शकाने हा चित्रपट देशविरोधी नसल्याचं समजावून सांगितलं होतं, पण स्थानिक लोकं ऐकायला तयार नव्हते.

चिन्मय मांडलेकरांनीसुद्धा या आक्रमक झालेल्या जमावाला त्यांनी याअगोदर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेबद्दल सांगितले आणि त्यांनी त्यांच्या महाराजांच्या भूमिकेतील मागचे चित्रपट दाखवले. त्यानंतर स्थानिक लोकांनी काही अटींवर त्यांना शूटींगसाठी मान्यता दिली होती. दिग्दर्शकाने आणि फारुख अहमद बिट्टा यांची भुमिका करणाऱ्या चिन्मय मांडलेकर यांनी शेवटी 'भारत माता की जय' अशा घोषणा द्यायच्या या अटीवर त्यांनी शूटींगसाठी परवानगी दिली होती.

दरम्यान देशात भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्यात आलेला नाही. मागच्या शुक्रवारी (ता.११) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कालपर्यंतच्या सहा दिवसातच या चित्रपटाने जवळपास ७९.२५ कोटींची भरघोस कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com