
The Kerala Story Reaction : 'आई म्हणून सांगते, 'केरळ स्टोरी'ला विरोध करणारे राजकीय पक्ष हे...' स्मृती इराणींची प्रतिक्रिया!
The Kerala Story Movie Reaction Smriti Irani : प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे त्यांच्या द केरळ स्टोरीवरुन चर्चेत आले आहे. विपुल शाह यांनी निर्मिती केलेल्या केरळ स्टोरी चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या मनोरंजन विश्वात या चित्रपटानं खळबळ उडवून दिली आहे. त्यावरुन वादाला देखील सुरुवात झाली आहे. हा चित्रपट प्रोपंगडा आहे. अशी टीका काही राजकीय पक्ष आणि कलाकारांनी केली आहे.
यासगळ्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांना जशास तसे उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळ स्टोरीला राजकीय रंग आल्याचे दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ स्टोरीवरुन कॉग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या राजवटीत ज्या काही गोष्टी घडल्या त्याकडे त्यांनी गांभीर्यानं लक्ष दिले नाही. असे मोदी म्हणाले होते. त्यांनी अप्रत्यक्षपणे केरळ स्टोरीला पाठींबा दिला होता. यापूर्वी मोदी यांनी द काश्मिर फाईल्सचे कौतूक केले होते. त्यानंतर केरळ स्टोरीवरुन त्यांनी केलेले वक्तव्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी केरळ स्टोरीला विरोध केला आहे. ज्यांनी विरोध केला आहे त्यांना प्रसिद्ध अभिनेते अनुमप खेर आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. खेर यांनी ज्या लोकांनी काश्मिर फाईल्सला विरोध केला होता आताही तेच लोक केरळ स्टोरीला देखील विरोध करत असल्याचे म्हटले आहे. यासगळ्यात स्मृती इराणी यांनी देखील ज्या राजकीय पक्षांनी केरळ स्टोरीला विरोध केला आहे त्यांना आपण दहशतावादाचे समर्थक म्हटले पाहिजे असे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना इराणी म्हणाल्या, जे पक्ष केरळ स्टोरीला विरोध करत आहे ते दहशतवादाच्या बाजूला आहेत. असेच म्हटले पाहिजे. मी एक आई या नात्यानं सांगते की, जे राजकीय पक्ष आपल्या देशातील नागरिकांच्या बाबत जे अत्याचार झाले ते विसरुन गेले आहेत, ते आता दहशतावादाच्या बाजूनं आहेत असेच म्हटले पाहिजे. अशी प्रतिक्रिया इराणी यांनी दिली आहे.
केरळ स्टोरीच्याबाबत सांगायचे झाल्यास हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसतो आहे. त्यानं चार दिवसांत पन्नास कोटींचा टप्पा गाठला आहे. मात्र देशातील काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनला बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.