'केरळ स्टोरी पाहायला थिएटरमध्ये कुणीच नव्हतं....', तामिळनाडू सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर |The Kerala Story |Tamil Nadu Government Reply To Sc | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kerala Story SC

The Kerala Story: 'केरळ स्टोरी पाहायला थिएटरमध्ये कुणीच नव्हतं....', तामिळनाडू सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

The Kerala Story Tamil Nadu Government Reply To Sc : अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आहे. या चित्रपटाला रिलिज होऊन बारा दिवस झाले असले तरी चित्रपट चागंली कमाई करत आहे. चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा पार केला असून आता लवकरच 200 कोटींची कमाई करेल असा दावाही केला जात आहे.

मात्र एकीकडे जिथे चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे तर दूसरीकडे चित्रपटावरुन सुरु झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाही आहे. अनेक राजकिय नेत्यांनी या चित्रपटावर टिका करत त्याला प्रोपगंडा म्हटलं आहे. तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगलाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

या चित्रपटावर तामिळनाडू घातलेल्या बंदीच्या विरोधात निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सरकारकडे याबद्दल उत्तर मागितले होते.

देशाच्या इतर भागात चित्रपट शांततेत चालू असताना बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी का घालण्यात आली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली, ज्याच्या उत्तरात तामिळनाडू सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलं.

याबाबत तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, द केरळ स्टोरीच्या निर्मात्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी विधाने केली आहेत की सरकारने चित्रपटावर बंदी घातली आहे.

द केरळ स्टोरी न दाखवण्यासाठी सिनेमा हॉल मालकांवर आम्ही दबाव आणला नाही, . सरकारच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात मोठे कलाकार नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे लोक चित्रपट पाहत नव्हते, त्यामुळे चित्रपटगृहांनीच चित्रपट काढून टाकला.

5 मे रोजी रिलीज झालेला हा चित्रपट 7 मे रोजी तामिळनाडूमधील सिनेमागृहांमधून काढण्यात आला. तर निर्मात्यांनी याला सरकारी दबाव म्हणत याचिका दाखल केली आहे. असं तामिळनाडू सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

या प्रकरणी तामिळनाडू सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे आणि म्हटले आहे की, 'प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे, थेटर मालकांनी स्वतः चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं आहे आणि सरकार सुरक्षा पुरवण्याशिवाय थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी काहीही करू शकत नाही असंही त्यानी म्हटले आहे.