लॉकडाऊनमध्ये 'हे' सिनेमे आणि वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. वाचा काय ठरेल तुमच्यासाठी जास्त मनोरंजक?

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Friday, 17 April 2020

सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर न पडता प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करता येईल यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्म  सक्रिय आहेत..हा प्रेक्षकवर्ग लक्षात घेता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे विषय हाताळले जात आहेत..

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे..लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातंच खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटगृह बंद करण्यात आले होते..परिणामी सिने निर्मात्यांनी देखील सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी ठेवण्याचा निर्णय घेतला..मात्र याचदरम्यान कित्येक डिजीटल प्लॅटफॉर्मवर नवनवीन सिनेमे आणि वेबसिरीज रिलीज होताना पाहायला मिळतायेत..सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर न पडता प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करता येईल यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्म  सक्रिय आहेत..हा प्रेक्षकवर्ग लक्षात घेता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे विषय हाताळले जात आहेत..नुकतीच ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'पंचायत' या वेबसिरीजला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसून येतोय..

Lockdown: रोहित शेट्टीची फोटोग्राफर्सना मदत, अकाऊंटमध्ये केले पैसे ट्रान्सफर

नेटफ्लिक्स-

१.  हसमुख

नेटफ्लिक्सवर कॉमेडी जॉनर पाहायचा असेल तर हसमुख या वेबसिरीजचा तुम्हाला पर्याय आहे.. अभिनेता वीर दास 'हसमुख' या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे..निखिल अडवाणी यांनी ही वेबसिरीज तयार केली असून ती १७ एप्रिल म्हणजेच आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे..एका सिरियल किलर कॉमेडियनची ही कथा आहे..हा एक असा कॉमेडियन आहे की त्याला त्याच्या कॉमेडीची जादू कायम ठेवण्यासाठी खून करणं गरजेचं आहे..

Hasmukh: Netflix unveils trailer of Vir Das' Original Series

 

२. मलंग 

दिशा पटानी, आदीत्य रॉय कपूर आणि अनिल कपूर स्टारर मलंग हा सिनेमा १७ एप्रिल म्हणजेच आजपासून दाखवला जाणार आहे..

What is your review of Malang (2020 Movie)? - Quora

 

३. एक्सट्रॅक्शन

प्रेक्षकांमध्ये थॉर म्हणून प्रसिद्ध असलेला हॉलीवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ 'एक्सट्रॅक्शन' हा सिनेमा घेऊन येत आहे..२४ एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होणा-या या सिनेमात बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा देखील दिसणार आहे..यासोबतंच अभिनेते पंकज त्रिपाठी देखीस पाहायला मिळतील..हा एक ऍक्शनपॅक्ड सिनेमा आहे..रणदीपचा हॉलीवूडमधला हा डेब्यु असून रणदीपच्या म्हणण्याप्रमाणे तो पहिलाच असा बॉलीवूड अभिनेता असेल ज्याने हॉलीवूड सिनेमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍक्शन्स केले असतील... 

Forget Endgame, Chris Hemsworth Says His New Netflix Movie Was The ...

 

४. मिसेस सिरीयल किलर

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि अभिनेता मनोज वाजपेयी देखील त्यांचा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत..या दोन्ही कलाकारांचे हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.. 'मिसेस सिरीयल किलर' हा सिनेमा १ मेला रिलीज होणार आहे..या डिजीटल सिनेमाची निर्मिती फराह खान हिने केली असून याचं दिग्दर्शन फराहचे पती शिरीष कुंदर यांनी केलं आहे..हा डिजीटल सिनेमा एका पत्नीवर आधारित आहे जिच्या पतीला सिरियल मर्डर केसमध्ये फसवलं गेलं आहे आणि तो जेलमध्ये आहे..तिला तिच्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तशाच प्रकारचा सिरियल मर्डर करणं गरजेचं आहे..

Trailer: Jacqueline turns Mrs. Serial Killer | Latest Andhra ...

 

ऍमेझॉन प्राईम-

१. फोर मोअर शॉट्स प्लीज

बोल्ड सीन्समुळे चर्चेत असलेला 'फोर मोअर शॉट्स प्लीज'च्या पहिल्या सीझन नंतर आता या वेबसिरीजचा दुसरा सिझन समोर आला आहे..'फोर मोअप शॉट्स प्लीज' १७ एप्रिल म्हणजेच आजपासून स्ट्रीम केली जाणार आहे..ही सिरीज तरुणाईला चांगलीच पसंत पडतेय..पहिला सिझन जिथे संपला होता तिथूनंच या दुस-या सिझनची सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.

Four More Shots Please! Season 2 Review: They Served Me Alcohol ...

२. शुभ मंगल ज्यादा सावधान 

अभिनेता आयुष्मान खुराना स्टारर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा देखील १७ एप्रिल म्हणजेच आजपासून दाखवला जाणार आहे..

Shubh Mangal Zyada Saavdhan Movie Review, IMDB Rating, Box Office ...

 

३. जोकर

ऑस्कर पुरस्कारावर यावेळी नाव कोरलेला 'जोकर' हा सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार आहे..याआधीच या प्लॅटफॉर्मने ऑस्कर पुरस्कार प्राप्त सिनेमे प्रेक्षकांना दाखवायला सुरुवात केली होती.. 'पॅरासाईट' आणि 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड' हे सिनेमे आधीपासून या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहेत..आता 'जोकर' मुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून लवकरंच तो या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल अशी आशा करुयात..

Hollywood Movie Joker Is Streaming on Amazon Prime Video, Release ...

 these movies and web series will be released in lockdown on ott platform  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these movies and web series will be released in lockdown on ott platform