Couple Goals : मराठी सेलिब्रिटींच्या रोमँटिक अंदाजापुढे सारंकाही फिकं!

सकाळ ऑनलाइन
Friday, 19 February 2021

पाहा मराठी सेलिब्रिटींचे खास फोटो

प्रेम ही भावना व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींना आपल्या मनातील भावना सर्व जगाला ओरडून सांगाव्याश्या वाटतात, तर काहींना ते प्रेम दोघांमध्येच खुलू द्यावं असं वाटतं. या प्रेमाच्या नात्यातही काही जोड्या एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळ्या असतात. दोन टोकांचे स्वभाव असले तरी, प्रेमाचा धागा त्या दोघांना जोडून ठेवत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील काही अशाच कलाकारांच्या जोड्या आहेत, ज्या चाहत्यांना 'कपल गोल्स' देतात. 

May be an image of 2 people

सिद्धार्थ-मिताली नुकतेच लग्नबंधनात अडकले असून या दोघांनी नेहमीच प्रेमाची व्याख्या नव्याने चाहत्यांसमोर मांडली आहे. 

May be an image of 2 people

प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो, हे शर्मिष्ठा राऊत आणि तेजसच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून सहज लक्षात येतं. 

May be an image of 1 person

शशांक केतकर आणि प्रियांकाच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही जोडीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. 

May be an image of 2 people

आयुष्यात कितीही संकटं आलं, काही नात्यांमध्ये वाईट अनुभव आला तरी प्रेम सर्वकाही शिकवतं, हे अभिज्ञा-मेहुलकडे पाहून समजतं. या दोघांनी नुकतंच लग्न केलं असून दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.  

May be an image of 1 person

मराठीतील लोकप्रिय जोड्यांपैकी ही एक आहे- सखी गोखले आणि सुव्रत जोशी

May be an image of 2 people

प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोन भिन्न स्वभावाचे आहेत. मात्र भिन्न स्वभावाचे लोक एकमेकांकडे आकर्षित होतात, ही ओळ या दोघांना तंतोतंत लागू होते. 

May be an image of 2 people

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेनं त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरील फोटोंमध्ये या दोघांचं प्रेम कधीच लपत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These mushy pics of Marathi celebrity couples set major couple goals