
लॉकडाऊनमध्ये मनोरंजन विश्वातील सर्व शूटींग्स बंद आहेत. त्यामुळे मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्याकडे सध्या निर्मात्यांचा आणि वाहिन्यांचा कल आहे.
मुंबई- लॉकडाऊनमध्ये मनोरंजन विश्वातील सर्व शूटींग्स बंद आहेत. त्यामुळे मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देण्याकडे सध्या निर्मात्यांचा आणि वाहिन्यांचा कल आहे. लहानापासूंन ते वृद्धांपर्यंत अनेकजण मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसतात त्यामुळे साहजिकंच मोबाईलवर अनेकदा मालिका आणि इतर कार्यक्रमांचा आस्वाद घेणं सोईचं झालं आहे. त्यातंच लॉकडाऊनमध्ये तर सिनेप्रेमींनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. दूरदर्शनवर पौराणिक मालिकांचं पुनःप्रक्षेपण दाखवण्यात आल्यानंतर अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. डिजीटलचा जमाना असल्या कारणाने काही प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांसाठी ओटीटीवर देखील दाखवण्यात येऊ लागल्या. यातंच आता भर पाडलीये ती झीमराठीच्या ZEE5 या ऍपने. तुमच्या आवडत्या मालिका आता ZEE5 वर तुम्हाला हवं तेव्हा पाहायला मिळणार आहेत.
ZEE5 या ऍपने लोकप्रिय अशा तीन मालिका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 'सिंधू', 'कृपासिंधू' आणि 'मंगळसूत्र' या प्रसिद्ध मालिका आता तुम्हाला हवं तेव्हा तुमच्या सोयीने ZEE5 वर पाहता येणार आहे. या तीनही मालिका तुम्ही याआधी फक्त मराठी या वाहिनीवर पाहिल्या असतील. मात्र या मालिका डिजीटलवर पाहण्याचा आनंद वेगळाच असणारे. याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अमूक याच वेळेला तुम्हाला टीव्ही समोर बसायची गरज नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या मालिका पाहू शकता. इतकंच नाही तर तुमचा एखादा एपिसोड मिस झाला असेल तर तो तुम्ही कधीही पाहू शकता.
'सिंधू 'या मालिकेत एका सामान्य मुलीची असामान्य कथा पाहायला मिळेल. या मालिकेत १९ व्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा आहे. तिचं बालपण, शिक्षण, लग्न अशा अनेक महत्वाच्या टप्प्यांवरील संघर्ष यानिमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही काल्पनिक कथा १९ व्या शतकातील असल्याने त्याकाळचं जीवन कसं होतं हे सुद्धा यात पाहायला मिळेल. सिंधूच्या आयुष्यात घडणारे वेगवेगळे बदल यात दिसतील. अदीती जलतरे, श्रीहरी अभ्यंकर, गौरी किरण, पूजा मिटबावकर यांसारखे कलाकार या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहेत. याआधी ही मालिका फक्त मराठी या वाहिनीवर तुम्ही पाहिली असेल मात्र आता ZEE5 ऍपवर तुमच्या या लाडक्या मालिकेचा हवा तेव्हा हवा त्या वेळेत आस्वाद घेता येईल.
'कृपासिंधू' ही मालिका तर सगळ्याच्याच आवडीची. स्वामी समर्थांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली होती. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांनी केलेले चमत्कार, त्यांचा अलौकिक अवतार आणि यतीन नंद्वानी यांनी साकारलेली स्वामींची भूमिका यासाठी ही मालिका प्रेक्षक आवर्जुन पाहतात.
तर 'मंगळसुत्र' ही अकला कुबल यांची मालिका स्त्री वर्गामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. अलका यांनी वसुधाचं पात्र यात साकारलेलं आहे. वसुधाचा दृष्ट लागावा असा संसार. पण संकटं कधी सांगून येत नाहीत. संकटांच्या वादळातून तिचं घर सावरणा-या वसुधेची गोष्ट 'मंगळसूत्र' या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. अलका कुबल आणि समीर आठल्ये निर्मित ही मालिका आता तुम्ही केव्हाही पाहू शकता ZEE5.
these three popular marathi shows now you can watch on ZEE5