पुढच्या वर्षी 'हे' नऊ बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

बॉलिवूडमध्ये मेरी कोम, एम. एस् धोनी, निरजा असे अनेक बायोपिक तयार झाले आणि प्रेक्षकांनी ते प्रचंड पसंत केले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक तयार होणार आहेत. जाणून घ्या नवीन वर्षामध्ये बॉलिवूडमध्ये कोणते बायोपिक तयार होणार आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये तयार होणारे चित्रपट हा नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. कॉमेडी, रोमॅन्टिक तर कधी एतिहासिक अशा वेगवेगळ्या शैलीने चित्रपट हे तयार होतात. त्यामध्येच बायोपिकलाही प्रेत्रकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांवर चित्रपट तयार करुन त्यांच्या घेतलेल्या परिश्रमाची कथा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याआधी बॉलिवूडमध्ये मेरी कोम, एम. एस् धोनी, निरजा असे अनेक बायोपिक तयार झाले आणि प्रेक्षकांनी ते प्रचंड पसंत केले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक तयार होणार आहेत. जाणून घ्या नवीन वर्षामध्ये बॉलिवूडमध्ये कोणते बायोपिक तयार होणार आहेत.

1. भारतीय ऑलंपिक नेमबाज अभिनव बिंद्राच्या उत्तम कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा अभिनववर तयार होणाऱ्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. ‘बिंद्रा’ असं या चित्रपटाचं नाव असून स्वत: अनिल कपूरही या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. 

Image may contain: 3 people, people smiling

2. अभिनेत्री दीपिका पदूकोनही तिच्या चित्रपटातून नेहमीच एक वेगळी छाप निर्माण करते. चित्रपटाची निवड करतानाही ती अतीशय काळजी घेते. तसेच आपल्या अभिनयासह तिनं बॉलिवूड आणि थेट हॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच ती भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्यावर तयार होणाऱ्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. दीपिका स्वत:  बॅडमिंटन खेळाडू आहे. वल्ड चॅन्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या सींधूची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Image may contain: 2 people, people smiling

3. मिस्टर परक्शेनिस्ट म्हणजे आमिर खान हा दरवर्षी काही मोजके सिनेमेच करतो पण ते सुपरहिट ठरतात. आचार्य रीजनिश म्हणजेच ओशो यांच्या बायोपिकमध्ये आमिर दिसणार आहे. त्याचसोबत बी-टाउनमध्येही अशीही चर्चा आहे की अभिनेत्री आलिया भटही या चित्रपमध्ये दिसणार आहे. ती मॉं आनंद लीला यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 

Image may contain: 2 people, beard, ocean and outdoor

4. महिला क्रिकेट टिमची कर्णधार मिताली राजवर बायोपिक तयार होणार आहे. तिची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री तापसी पन्नू. तापसी पन्नू अतीशय चॅलेंजीग रोलमधून समोर आली आहे. मितालीची भूमिका साकारताना ती वेगळी भूमेतून झळकणार आहे. मिताली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिची ही कामगिरी आणि क्रिकेटमधील प्रवास हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Image may contain: 2 people, people smiling, people sitting

5. अभिनेते बोमन इराणी हे लवकरच ‘झलकी’ या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. हा बायोपिक नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैशाल सत्यर्शी यांच्यावर आधारीत आहे. जवळपास 144 देशांतील 83,000 पेक्षा जास्त मुलांच्या शिक्षणाच्या हक्कसाठी लढणाऱ्या सत्यर्शी यांचे काम शब्दात न मांडण्यासारखंच आहे. बालमजूरीसारख्या महत्त्वाच्या विषयावरही हा चित्रपट भाष्य करणार आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, beard

6. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची लोकप्रियता शिगेला पोहचली आहे. बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानमधून सुखरुप परतलेल्या अभिनंदन यांचा संपूर्ण देशाला हेवा वाटतो. त्यांच्या सारखी हेअर आणि दाढी हा देशामध्ये ट्रेंड झाला होता. अभिनंदन यांच्यावर आता बायोपिक तयार होणार आहे ज्याचं निर्देशन विवेक ओबेरॉय करणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकते दिसणार असल्याची चर्चाही सध्या बी-टाउनमध्ये केली जात आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

7. शटर क्विन सायना नेहवाच्या बायोपिकमध्ये परिणीती चोप्रा दिसणार आहे. यापूर्वी श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेत दिसणार होती मात्र काही कारणाने तिने हा चित्रपट सोडला. या चित्रपटाच्या शुटिंगल सुरुवात झाली असून परिणीतीने यासाठी बॅडमिंटनचे धडेही गिरवले. पुढच्या वर्षी या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

8. कारगिलच्या वॉरवर याआधी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट तयार झाले आहेत. आता मात्र एका खास भूमिकेसह आणि कारगिलमधील 'शूर हिरो' वर एक बायोपिक तयार होणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यामधून झळकणार आहे. हा बायोपिक तयार होतोय़ तो, कॅप्टन विक्रम बाट्रा यांच्यावर. 'शेर शहा' म्हणून ओळखल्या जाणारे विक्रम हे कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले. विक्रम यांच्या धैर्यासाठी परमवीर चक्र देण्यात आलं होतं. 

Image may contain: 8 people, people smiling

9. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 ला आणखी एका खास बायोपिक तयार होत आहे आणि तोही भारतातील पहिल्या वायुदल अधिकारी गुंजन सक्सेना यांच्यावर. या चित्रपटाच्या शुटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून त्याचा पहिला पोस्टरही रिलिज झाला आहे. जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनित कुमार, मानव विज ही मंदळीही दिसणार आहेत. पंकज त्रिपाठी यामध्ये जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 13 मार्च 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These upcoming nine biopics will give release next year