‘त्यांनी आत्महत्या केली नाही, तर... : दीपिका पदुकोण

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

दीपिकाच्या पोस्टनुसार जगभरात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. गेल्या आठवड्यात ताण-तणावाने दोन चांगल्या कलाकारांचा बळी घेतला. ते स्वतःला संपवू इच्छित नव्हते, पण गंभीर तणावाने त्यांचा बळी घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर डिप्रेशनवर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये दावा केला आहे की, केट स्पेड आणि एंथोनी बॉर्डन यांनी आत्महत्या केली नसून, ताण-तणावाने त्यांचा बळी घेतला आहे. 

केट स्पेड 56 वर्षीय प्रसिद्ध अमेरिकन फॅशन डिझायनर होते. 5 जूनला ते राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहाजवळ एक आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र आढळून आले. 62 वर्षीय अमेरिकन टीव्ही कलाकार एंथोनी बॉर्डन यांनी 8 जूनला आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. .या दोन धक्कादायक आत्महत्यांवर आधारित दीपिकाने ही पोस्ट शेअर केली. 

दीपिकाच्या पोस्टनुसार जगभरात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. गेल्या आठवड्यात ताण-तणावाने दोन चांगल्या कलाकारांचा बळी घेतला. ते स्वतःला संपवू इच्छित नव्हते, पण गंभीर तणावाने त्यांचा बळी घेतला. त्यामुळे तणाव हा असा आजार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनच्या मते मेंटल हेल्थ जनजागृतीसाठी सातत्याने कॅम्पेनिंग होण्याची गरज आहे. तणावातून बाहेर पडण्यासाठी ही संस्था मदत करते. 

Web Title: they never suicide depression takes their lives said deepika padukone