तिसऱ्यांदा आई होणाऱ्या लिसाचा बिकिनी फोटो व्हायरल

स्वाती वेमूल
Thursday, 18 February 2021

लिसाने व्यावसायिक डिनो लालवानीशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.

अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा गरोदर असून काही दिवसांपूर्वीच तिने व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. त्यानंतर आता तिने पहिल्यांदाच फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिला बेबी बंप स्पष्टपणे दिसून येतोय. लिसाने व्यावसायिक डिनो लालवानीशी लग्न केलं असून या दोघांना दोन मुलं आहेत. जॅक आणि लिओ अशी या दोन मुलांची नावं आहेत. 

लिसाने पोस्ट केलेला हा फोटो जानेवारी महिन्यातला आहे. 'जानेवारी २०२१' असं तिने या फोटोला कॅप्शन दिलं असून समुद्रकिनारी ती उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. बिकिनीमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसून येत आहे. याआधीही लिसाने गरोदर असताना बिकिनी शूटमधले फोटो पोस्ट केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

लिसाने जो सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात एक लहान मुलगा येऊन सांगतो की माझ्या जोडीला एक बहीण येणार आहे. त्यावेळी लिसा तिच्या मुलाला सांगते की, तू सगळ्यांना सांगू शकतो की आईच्या पोटात काय आहे? तेव्हा चिमुकला जॅक खूश होऊन सांगतो माझी बहीण. 

हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

लिसाने २०१० मध्ये 'आएशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'क्वीन' या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. यामध्ये तिने कंगना राणावतच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहायक्क अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. त्यानंतर 'हाऊसफुल ३' आणि 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. अभिनेत्रीसोबतच लिसा मॉडेल म्हणून फार प्रसिद्ध आहे. 'हार्पर बझार', 'ग्रेझिया', 'कॉस्मोपॉलिटन', 'वोग इंडिया', 'फेमिना इंडिया' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या कव्हरसाठी तिने फोटोशूट केलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third time pregnant Lisa Haydon debuts her baby bump in bikini picture