'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान'चा लोगो प्रदर्शित (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

येत्या दिवाळीत 8 नोव्हेंबरला 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' प्रदर्शित होणार आहे. यशराज या बिग बजेट बॅनरखाली सिनेमा बनला आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्टारर 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' या सिनेमाची चर्चा बऱ्याच दिवसापासून होती. अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही सिनेमातच प्रमुख भुमिका आहेत. सिनेमाचा लोगो व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातून युध्द आणि रणनिती यांचा अनुभव घेता येईल. 

सिनेमातील पात्र हे पुरातन काळातील आहेत. ध्वज, राजवाडे, तलवारी, भाले यांचे दर्शन हा लोगो व्हिडीओ बघितल्यावर होईल. व्हिडीओला दिलेले संगीतही युध्द, राजा-महाराजे, दरबार, इतिहास या गोष्टींना शोभणारे आहे. 

येत्या दिवाळीत 8 नोव्हेंबरला 'ठग्स् ऑफ हिंन्दुस्थान' प्रदर्शित होणार आहे. यशराज या बिग बजेट बॅनरखाली सिनेमा बनला आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आमिर खानने लोगो व्हिडीओ ट्विट केला आहे. 
 

Thugs of Hindostan 

Thugs of Hindostan

Thugs of Hindostan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thugs Of Hindostan Logo Video Launched