मुंबई- दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमीर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती.
मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, भरपूर खर्च असं एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल अशी आशा होती. पण याउलट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ने प्रेक्षकांची सपशेल निराशा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल करणारे बरेच मीम्स व्हायरल होत आहेत.
दरम्यान, 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य असून या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच आमीर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.