स्पायडरमॅनला लाभला टायगर श्राॅफचा आवाज

टीम इ सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

स्पायडरमॅनसारखं उडावं ही माझी इच्छा होती. मला लहानपणी नेहमी स्पायडरमॅनचं आकर्षण वाटे. पीटर पार्करचे सगळे भाग मी पाहिले आहेत. कधीतरी पीटर पार्कर अर्थात स्पाय़डरमॅन साकारता यावा असे मनोमन वाटे. पण, आता ते माझे स्वप्न अर्धे पूर्ण झाले आहे. कारण स्पायडरमॅन होमकमिंगमधील स्पायडरमॅनला मी आवाज देऊ शकलो, अशा शब्दात टायगर श्राॅफने आपल्या भावना व्यक्त केल्या. कारण या शुक्रवारी येणार्या स्पायडरमॅन होमकमिंग या सिनेमातल्या स्पायडरला टायगरचा आवाज लाभला आहे. 

मुंबई : स्पायडरमॅनसारखं उडावं ही माझी इच्छा होती. मला लहानपणी नेहमी स्पायडरमॅनचं आकर्षण वाटे. पीटर पार्करचे सगळे भाग मी पाहिले आहेत. कधीतरी पीटर पार्कर अर्थात स्पाय़डरमॅन साकारता यावा असे मनोमन वाटे. पण, आता ते माझे स्वप्न अर्धे पूर्ण झाले आहे. कारण स्पायडरमॅन होमकमिंगमधील स्पायडरमॅनला मी आवाज देऊ शकलो, अशा शब्दात टायगर श्राॅफने आपल्या भावना व्यक्त केल्या. कारण या शुक्रवारी येणार्या स्पायडरमॅन होमकमिंग या सिनेमातल्या स्पायडरला टायगरचा आवाज लाभला आहे. 

या सिनेमाची हिंदी आवृत्ती लवकरच येते आहे. या सिनेमातला आवाज माझा आहे, हे मला बर्याचदा खरे वाटत नाही. मला वाटते, लोकांनाही माझा आवाज ऐकायला आवडेल. मी दरवेळी काहीतरी नव्याने शिकण्याचा प्रयत्न करतोय. यातून नवी क्षितीजे मला खुली होतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 

Web Title: tigar shroff dubbing esakal news

टॅग्स