Tiger 3 Video: सेटवरून व्हिडिओ झाला लीक.. काही मिनिटांतच व्हायरल..व्हिलनचा चेहरा आला समोर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger 3 Video

Tiger 3 Video: सेटवरून व्हिडिओ झाला लीक.. काही मिनिटांतच व्हायरल..व्हिलनचा चेहरा आला समोर..

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' हा रिलिज होण्यापुर्वीच सतत चर्चेत आहे. चाहत्यांना या चित्रपटाशी संबधित प्रत्येक अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतात. या चित्रपटाची चर्चा आणखी एका कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

आता पर्यंत या चित्रपटाशी संबधीत अनेक अपडेट आल्या आहेत मात्र आता या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा अगदी छोटासा व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

'टायगर 3' मध्ये सलमानच्या विरुद्ध इम्रान हाश्मी दिसणार आहे. यात इम्रान व्हिलन असल्याचंही बोललं जात आहे. सेटवरून लीक झालेला व्हिडीओ एका खोलीतला असल्याचं दिसत आहे, ज्यामध्ये आजूबाजूला धूर दिसतो. व्हिडिओमध्ये इम्रान हाश्मी उभा दिसत आहे. काही मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टायगर 3' हा 'टायगर'च्या सिरिजचा तिसरा चित्रपट आहे. 2012 मध्ये 'एक था टायगर' आणि 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अशा परिस्थितीत चाहत्यांना आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची खूप उत्सुकता आहे