शिवभक्त टायगर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

टायगर श्रॉफ हा सध्याचा बॉलिवूडमधला उत्तम डान्सर आणि ऍक्‍शन हिरो मानला जातो. तो म्हणतो की, मला डान्स आणि ऍक्‍शनची प्रेरणा खऱ्या अर्थाने डान्स आणि ऍक्‍शनचे हिरो असणाऱ्या भगवान शंकर यांच्याकडून मिळते. शंकरानेच तांडवाला जन्म दिला. त्यांच्यामध्ये नाचताना जी एनर्जी आणि स्फुर्ती असते तीच स्फुर्ती आणि एनर्जी माझ्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच भगवान शंकराला खरा ऍक्‍शन हिरो मानतो. टायगर म्हणतो की, मी लहान असल्यापासूनच भगवान शंकराला मानतो. मी जस जसा मोठा होत गेलो, तस तशी माझी भक्तीही वाढत गेली. मी आधी सोमवारी व्रत करायचो; पण आता माझ्या कामामुळे मला ते शक्‍य होत नाही.

टायगर श्रॉफ हा सध्याचा बॉलिवूडमधला उत्तम डान्सर आणि ऍक्‍शन हिरो मानला जातो. तो म्हणतो की, मला डान्स आणि ऍक्‍शनची प्रेरणा खऱ्या अर्थाने डान्स आणि ऍक्‍शनचे हिरो असणाऱ्या भगवान शंकर यांच्याकडून मिळते. शंकरानेच तांडवाला जन्म दिला. त्यांच्यामध्ये नाचताना जी एनर्जी आणि स्फुर्ती असते तीच स्फुर्ती आणि एनर्जी माझ्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच भगवान शंकराला खरा ऍक्‍शन हिरो मानतो. टायगर म्हणतो की, मी लहान असल्यापासूनच भगवान शंकराला मानतो. मी जस जसा मोठा होत गेलो, तस तशी माझी भक्तीही वाढत गेली. मी आधी सोमवारी व्रत करायचो; पण आता माझ्या कामामुळे मला ते शक्‍य होत नाही. टायगर त्याचे प्रत्येक काम सोमवारपासूनच सुरू करतो. 
 

Web Title: Tiger devotee of Lord Shiva

टॅग्स