
अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते..नुकतंच कृष्णा श्रॉफने इंस्टाग्रामवर तिचे बिकनीमधील काही खास फोटो पुन्हा एकदा शेअर केले आहेत..
मुंबई- अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते..काही दिवसांपूर्वी तिने बाल्कनीमध्ये वर्कआऊट करताना बिकनी घालून फोटो शेअर केले होते..इतकंच नाही तर सनबाथ घेताना देखील तिने बिकनी घातलेला फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली होती..नुकतंच कृष्णा श्रॉफने इंस्टाग्रामवर तिचे बिकनीमधील काही खास फोटो पुन्हा एकदा शेअर केले आहेत..
कृष्णाने शेअर केलेल्या हा फोटोवर बॉलीवूडमधील अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत..खास करुन टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेल्या दिशा पटानीने देखील यावर कमेंट केली आहे..दिशाने या फोटोवर कमेंट करत म्हटलंय बॉडी..आणि यापुढे तिने आगीचं इमोजी देखील पोस्ट केलंय..कृष्णाच्या या फोटोवर केवळ दिशानेच नाही तर भाऊ टायगर श्रॉफने देखील कमेंट केली आहे..टायगरने कृष्णाच्या बिकनी फोटोवर कमेंट करताना डोळ्यांवर हात ठेवलेला इमोजी पोस्ट केला आहे..
कृष्णा नेहमीच तिच्या वर्कआऊट आणि फिटनेसमुळे चर्चेत असते..मात्र एक काळ असाही होता जेव्हा थी फिट नव्हती..कृष्णाने काही दिवसांपूर्वीच तिचा फॅट टू फीट प्रवास फोटोमधून चाहत्यांसोबत शेअर केला होता. कृष्णा नेहमीच लाईम लाईटपासूु दूर जरी असली तरी तिच्या बोल्ड फोटोंमुळे मात्र चर्चेत राहताना दिसते..तीला वडिल जॅकी श्रॉफ आणि भाऊ टायगर सारखं सिनेइंडस्ट्रीत यायचं नसल्याचं तिने अनेकदा सांगितलं आहे..
कृष्णाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर ती इंस्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत असते. मात्र नुकंतेच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो डिलीट केले आहेत..
सोशल मिडियावर कृष्णा आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो होते आणि ती दिलखुलासपणे ते शेअरही करत होती मात्र अचानक तिच्या अकाऊंटवरुन तिने फोटो का डिलीट केले हे मात्र अजुन समजू शकलेलं नाही..
tiger shroff reacts on sister krishna shroffs bikini photos