esakal | ऍक्शन हिरो टायगर श्रॉफच्या आवाजाची जादू, चाहते पडले प्रेमात..
sakal

बोलून बातमी शोधा

tiger shroff

अभिनेता टायगर श्रॉफने वरुणच्या 'ऑक्टोबर' या सिनेमातील 'ठहर जा' हे गाणं गायलं आहे.

ऍक्शन हिरो टायगर श्रॉफच्या आवाजाची जादू, चाहते पडले प्रेमात..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने ऍक्शन हिरो टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर गाणं गाताना दिसतोय. आता तुम्ही म्हणाल मग टायगरचा व्हिडिओ वरुणने का शेअर केला तर याचं एक खास कारण आहे. अभिनेता टायगर श्रॉफने वरुणच्या 'ऑक्टोबर' या सिनेमातील 'ठहर जा' हे गाणं गायलं आहे. वरुणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन टायगरचा हा गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टायगरचा डॅशिंग लूक देखील पाहायला मिळतोय.

हे ही वाचा: आजपर्यंत नृत्याच्या माध्यमातून मन जिंकलेल्या माधुरीने आता चाहत्यांवर केली आपल्या आवाजाची जादू

अभिनेता वरुण धवनने टायगरचा हा गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय, हे 'ऑक्टोबर' सिनेमातील माझं आवडतं गाणं आहे.खूप आनंद झाला.' टायगरने यावर प्रतिक्रिया देत 'भावा, काल युएफसीची बातमी देऊन तु आनंदी केलं होतंस.'  

वरुणच्या आधी टायगरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून हृतिक रोशन, श्रद्धा कपूर, दिशा पटानी, अरमान मलिक, अथिया शेट्टी सोबत इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी टायगरच्या आवाजाचं कौतुक केलं होतं. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

'आय फॉर इंडिया' या कॉन्सर्टसाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. या कॉन्सर्टमध्ये आश्चर्यकारक परफॉर्मन्स होता तो तरुण ऍक्शन हिरो टायगर श्रॉफ याचा. त्याच्या गाण्याच्या टॅलेंटने त्याने उपस्थितांना चकित केलं. इतकंच नाही तर त्याच्या आवाजासाठी अनेकांकडून त्याच्या या लपलेल्या टॅलेंटचं कौतुकही झालं. 

सिनेमांच्या बाबतील सांगायचं झालं तर, जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर शेवटचा अहमद खान दिग्दर्शित बागी ३ मध्ये दिसला होता. तर वरुण धवन सारा अली खानसोबत आगामी कुली नंबर १ या सिनेमात झळकणार आहे.     

tiger shroffs video going viral praises his voice in bollywood  
 

loading image