
Time Influential List : जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत 'राजामौली, शाहरुख', नंबर 1 कोण ?
Time 100 Most Influential List : जगप्रसिद्ध अशा टाईम मासिकानं जगातील सर्वात प्रभावी अशा १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. टाईमच्या मासिकाचा दरारा आणि त्याची लोकप्रियता ही सर्वांना ठाऊक आहे. त्यांचा वाचकवर्ग हा जगभरामध्ये पसरला आहे. त्यामुळे त्या मासिकानं कुणाचा गौरव करणे अथवा संबंधित व्यक्तींविषयी काही लिहिणे याकडे वाचक गांभीर्यानं पाहतात.
टाईमच्या त्या यादीमध्ये जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील दोन व्यक्ती आहेत. पहिला बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि ज्यांनी भारताला दुसरे ऑस्कर मिळवून दिले ते आरआरआऱ या चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली. राजामौलींच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नुकताच ऑस्कर मिळाला. त्यामुळे जगभरामध्ये त्यांचे नाव मोठ्या आदरानं घेतलं जात आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला ऑस्कर मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Also Read - पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी
त्या यादीमध्ये जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी, टीव्ही होस्ट पद्मलक्ष्मी यांचा देखील समावेश आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, किंग चार्ल्स, सीरियामध्ये जन्म झालेले लेखक तेराक आणि समाजसेविका सारा मर्दिनी, युसरा मर्दिनी तसेच स्टार आयकॉन बेला हदीद यांचीही नावे आहेत. या यादीमध्ये एलॉन मस्कचे नाव नसेल तर अनेकांना आश्चर्यच वाटेल. तेही नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अरबपती एलॉ़न मस्क, गायक बियॉन्स यांचीही नावं यादीमध्ये आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान विषयी त्याची सहकलाकार दीपिका पदुकोणनं देखील काही गोष्टी लिहिल्या आहेत. ती म्हणते, जे कुणी शाहरुखला जवळून ओळखतात त्यांना तो किती चांगला आहे हे वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. त्याची मैत्री खूप काही शिकवून जाणारी आहे. केवळ १५० शब्दांमध्ये त्याच्याविषयी सांगणं हे मला जमणार नाही. पण ती व्यक्ती खूप मोठी आहे. अशा शब्दांमध्ये दीपिकानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
टाईमच्या या यादीसाठी जगभरातील १.२ मिलियन वाचकांनी मतदान केले. त्यात चार टक्के मतं ही शाहरुख खानला मिळाली. अशाप्रकारे एवढी मतं घेऊन तो पहिल्या स्थानावर आहे. राजामौली यांच्याविषयी आलिया भट्टनं खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, भारतातील लोकांना माहिती आहे की, त्यांनी भारतीयांना काय दिले आहे. ते उच्च दर्जाचे दिग्दर्शक आहेत. मास्टर स्टोरीटेलर अशी त्यांची ओळख आहे. भारतीय प्रेक्षक त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतात. अशा शब्दांत आलियानं गौरव केला आहे.