प्रेशर से मुक्त हो.. बाबा रणवीर सिंगचा कानमंत्र

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सळसळता उत्साह म्हणून रणवीर सिंगकडे पाहिलं जातं. सतत नवा खट्याळपणा करणारा.. फॅशनचे नवनवे ट्रेंड आणणारा म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, याला कारण आहे, त्याने केलेलं ट्विट. अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या टाॅयलेट या चित्रपटाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. रणवीरनेही नुकताच हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाला मिळालेल्या यशाने हे दोघेही खुश झाले आहे. त्यांनी शेअर केलेल्या टि्वटवरून ते लक्षात येतं.

मुंबई : सळसळता उत्साह म्हणून रणवीर सिंगकडे पाहिलं जातं. सतत नवा खट्याळपणा करणारा.. फॅशनचे नवनवे ट्रेंड आणणारा म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, याला कारण आहे, त्याने केलेलं ट्विट. अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या टाॅयलेट या चित्रपटाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. रणवीरनेही नुकताच हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाला मिळालेल्या यशाने हे दोघेही खुश झाले आहे. त्यांनी शेअर केलेल्या टि्वटवरून ते लक्षात येतं.

प्रेशर से मुक्ती, अपना मनोरंजन टाॅयलेटसे करो असं सांगून रणवीर सिंगने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रणवीर धावत येत टाॅयलेटचा दरवाजा ठोठावतो असं दिसतं. त्यातून अक्षयकुमार बाहेर येत आपल्या नव्या सिनेमालाा मिळालेलं यश सेलिब्रेट करताना दिसतात. यावर एके आणि आरएस.. एक प्रेमकथा असाही टॅग लावण्यात आला आहे. तर यापूर्वी हा सिनेमा प्रमोट त्याने प्रमोट केला तो भूमी पेडणेकर सोबत. भूमी पेडणेकरच्याच रूममध्ये जाऊन रणवीरने तिथे धमाल उडवली आहे. भूमीलाच त्याने टाॅयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट कसा चांगला आहे, याचा डोस दिला आहे. भूमीची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. रणवीरने हा चित्रपट जोरदार प्रमोट केला आहेच, पण त्याच्या माकडचेष्टांमुळेही तो चर्चेल आला आहे.

Web Title: Toildet ek premkatha pramoted by Ranveer singh esakal news