ट्रकच्या वन लाईनचं झालं गाणं 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

आपण बाहेरगावी प्रवास करत असताना आपल्याला हमखास रस्त्यावरून जाणारे ट्रक दिसतात आणि त्या ट्रकवर लिहिलेल्या ओळी वाचून आपण खूप हसतोही. बूरी नजरवाले तेरा मूँह काला, पाहू नकोस प्रेमात पडशील, हमारी चलती है लोगों की जलती है असे बरेच हसवणारे वन लाईनर आपण वाचतो, पण याच वन लाईनरवरून कोणी चित्रपटात गाणं लिहिलं तर...

हो खरंच असं घडलंय. अक्षय कुमारच्या भारत स्वच्छता अभियानाला पाठिंबा देणाऱ्या "टॉयलेट- एक प्रेमकथा' या चित्रपटात "हंस मत पगली प्यार हो जायेगा' या ट्रकवर लिहिलेल्या वन लाईनरवरून लिहिलेलं गाणं चित्रित करण्यात आलंय. हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. हे खूप मजेशीर असलेलं गाणं आहे. सोनू निगम आणि श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर भूमी पेडणेकर आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Toilet Ek Prem Katha. Akshay Kumar