Tollywood Actor Rajnikanth mahesh
Tollywood Actor Rajnikanth mahesh esakal

बॉलीवूडच काय हॉलीवूडलाही 'रजनीकांत' परडवणार नाही, प्रख्यात अभिनेत्रीनं पुन्हा डिवचलं

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा काही दिवसांपासून वाद रंगला आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Bollywood vs Tollywood: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा काही दिवसांपासून वाद रंगला आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. प्रख्यात अभिनेता महेश बाबुनं यापूर्वी आपण काही बॉलिवूडला परडवणारे अभिनेते (Bollywood actor) नाही. मला बॉलीवूडमध्ये काम करण्यास कोणताही रस नाही. असे त्यानं म्हटले होते. त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात वाद रंगला होता. (Tollywood actor) nबॉलीवूडमधील काही प्रसिद्ध दिग्दर्शकांनी त्यावरुन महेश बाबुला ट्रोल केले होते. त्यात राम गोपाल वर्मा यांनी महेश बाबु तुझा बॉलीवूडशी (Ram gopal varma) संबंध काय असा थेट प्रश्न संबंधित अभिनेत्याला विचारला होता. आता टॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं याप्रकरणात रजनीकांत यांचे नाव घेऊन पुन्हा एका नव्या चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये रजनीकांत यांना अभिनयाचा देव मानले जाते.

टीव्ही अभिनेत्री जयश्री वेंकटरमन यांनी बॉलीवूडवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड या घटनेकडे लक्ष वेधले गेले आहे. तिनं म्हटलं आहे की, बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड रजनीकांत हे कुणालाच परडवणारे अभिनेते नाहीत. आता अशाप्रकारच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद रंगण्याची शक्यता आहे. त्याचे काय आहे की, गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडचं बॉक्स ऑफिसवरील अपयश प्रकर्षानं दिसून आलं आहे. याला कारण आहे टॉलीवूडचे प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यामध्ये अल्लु अर्जुनचा पुष्पा, थलापती विजयचा बिस्ट, मास्टर, अजिथचा वल्लीमाई, आरआऱआर आणि यशच्या केजीएफनं बॉलीवूडची झोप उडवून टाकल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये बॉलीवूडचे मोठमोठे सुपरस्टार यांनाही मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे.

Tollywood Actor Rajnikanth mahesh
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

एका मुलाखतीमध्ये जयश्री यांनी सांगितलं की, मला माहिती आहे की, टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुच्या एका प्रतिक्रियेवरुन सगळा वाद सुरु झाला. सध्या परिस्थिती काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रेक्षकांची पसंती कुणाला आहे हेही सर्वांना माहिती आहे. मला विचाराल तर, वैयक्तिक मला अभिनयात महेश बाबु पसंतीचा अभिनेता आहे. मी त्याची मोठी फॅन आहे. त्याच्यासाठी चाहते किती वेडे आहेत हे मी स्वता अनेकदा पाहिलं आहे. यासगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोकं रजनीकांत यांचा फोटो लावून त्यांची पूजा करताना मी पाहिलं आहे. लोकं त्यांना देव मानतात. ते दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाचे देव आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे बाकी काही नाही. बॉलिवूडच काय तर हॉलीवूडला ते परडवणारे नाहीत. आता मला सांगा प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळत असेल तर ते कोण नाकारेल, त्यामुळे आपण जो वाद निर्माण करतो आहोत त्याला काही अर्थ नसल्याचेही जयश्री यांनी यावेळी सांगितले.

Tollywood Actor Rajnikanth mahesh
Video Viral : सैफ अली खानचा लेक कोणाला करतोय डेट ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com