कास्टींग काउच विरोधात अभिनेत्रीने काढले कपडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

कास्टींग काउचच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत एका तेलगू अभिनेत्रीने आंदोलन केल्याची घटना आज घडली.

हैदराबाद - फिल्म इंडस्ट्रीत कास्टींग काउच हा विषय तसा जुना आहे. फक्त काही चेहरे या कास्टींग काउच चे शिकार होतात आणि पुढे येतात तेव्हा त्याची प्रत्येकवेळी होणारी चर्चा तेवढी नवी. अशाच एका कास्टींग काउचच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत एका तेलगू अभिनेत्रीने आंदोलन केल्याची घटना आज घडली. तेलगू फिल्म इंडस्ट्रीही या घाणेरड्या सत्याला अपवाद नाही हेच यावरुन समोर आले आहे. 

श्री रेड्डी असे अभिनेत्रीचे नाव आहे. तिने केलेल्या आरोपानुसार, 'सिनेमात काम मिळावे म्हणून सिनेसृष्टीतील काही जणांच्या मागणीवरुन काही न्यूड फोटो आणि व्हिडीओ आपण पाठवले. त्यांनी मला लाईव्ह न्यूड व्हिडीओही करायला सांगितले. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझे लैंगिक शोषणही केले. सिनेमात काम करायला आलेल्या मुलींचे असेच शोषण केले जाते. माझा व्हिडीओ त्यांनी बघितला पण सिनेमात काम मात्र दिले नाही.'
Sri Reddy

या सर्वांचा निषेध म्हणून रेड्डी हिने आज सकाळी हैदराबाद फिल्म सिटीतील तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भररस्त्यात कपडे काढले. स्थानिक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. 'मला या सर्व परिस्थितीची चीड आली होती. मला व्यक्त होण्यासाठी हाच मार्ग दिसला. निर्माते स्थानिक मुलींना काम देण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण करतात. जर सिनेमा निर्मात्यांनी स्थानिक कलाकारांना समधी दिली नाही तर हा मुद्दा मी अजून मोठा बनवेन', असा इशाराही श्री रेड्डी हिने दिला आहे. 

Web Title: Tollywood Actress Sri Reddy Goes Topless Against Casting Couch