esakal | ड्रग्ज प्रकरण: चौकशीसाठी रकुल प्रीत सिंग ईडी कार्यालयात हजर
sakal

बोलून बातमी शोधा

rakul preet singh

ड्रग्ज प्रकरण: चौकशीसाठी रकुल प्रीत सिंग ईडी कार्यालयात हजर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने Rakul Preet Singh हैदराबादमधील ईडी Enforcement Directorate कार्यालयात हजेरी लावली आहे. ईडीने चार वर्ष जुन्या एका ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि दिग्दर्शकांना समन्स बजावले होते. यात रकुलसह राणा डग्गुबती, रवी तेजा, पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशीसाठी रकुलने आज (शुक्रवारी) ईडी कार्यालयात हजेरी लावली आहे.

रकुलसह राणा, रवी तेजा, पुरी जगन्नाथ यांनादेखील ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत या ड्रग्ज प्रकरणात १२ लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत. हे प्रकरण तेलंगणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. जुलै २०१७ साली या विभागाद्वारे एका बारमध्ये छापा टाकला होता. झाडाझडतीनंतर या ठिकाणी वेगवेगळी १२ प्रकरणे समोर आली होती.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाचं निधन; नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली दाक्षिणात्य सिद्धार्थला

या प्रकरणांवर ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. आता रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा आणि पुरी जगन्नाथ यांची नावे समोर येत आहेत. मात्र, ते मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये सामील आहेत की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. "तेलंगण राज्या उत्पादन शुक्ल विभागाने सुमारे १२ गुन्हे नोंदवले असून ११ चार्जशीट दाखल केल्या आहेत. मुख्यत: ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं असून जोपर्यंत आम्हाला पुरावे मिळत नाही, तोपर्यंत टॉलिवूड सेलिब्रिटी साक्षीदार मानले जातील. कारण त्यांची नावं तपासात समोर आली आहेत", अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top