पुन्हा टॉलीवूडचीच सरशी! सम्राट पृथ्वीराजला 'विक्रम'चा धक्का

टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा वाद सुरु असताना पुन्हा एकदा टॉलीवूडच्या चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
Tollywood Vs Bollywood Samrat Prithviraj Movie second day collection
Tollywood Vs Bollywood Samrat Prithviraj Movie second day collection esakal

Tollywood Vs Bollywood: टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा वाद सुरु असताना पुन्हा एकदा टॉलीवूडच्या चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध (Akshay Kumar) अभिनेता कमल हासन, विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेला विक्रम हा चित्रपट बॉलीवूडच्या सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना (Kamal Haasan) धक्का देतोय. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र दोन दिवसांत या चित्रपटानं केलेली (Samrat Prithviraj) कमाई निराशाजनक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडला टॉलीवूडनं मागे सारले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर नजर टाकल्यास त्य़ामध्ये बॉक्स ऑफिसवर (Vikram Movie) सर्वाधिक य़शस्वी झालेल्या चित्रपटांमध्ये टॉलीवूडच्या चित्रपटांची संख्या अधिक आहे. आरआरआर, केजीएफ 2 या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज हा प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्या नावावरुन वाद रंगला होता. त्यामुळे वादाचा परिणाम चित्रपटाला तारक ठरणार की मारक असा प्रश्न उपस्थित झाला होता. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी दहा कोटींची कमाई केली होती. तर विक्रमची एवढी कमाई एकट्या तामिळनाडू राज्यातून होती. उर्वरीत भागातून त्याला सहा कोटींहून अधिक कमाई करता आली. यावरुन दोन्ही चित्रपटांमधील कमाईचा फरक लक्षात येईल. दुसऱ्या दिवशी सम्राटनं आघाडी घेतली होती. मात्र ती विक्रमला टक्कर देईल अशी नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर मेजर, विक्रम, सम्राट पृथ्वीराज, मराठी चित्रपट - सरसेनापती हंबीरराव मोहिते, हॉलीवूडचा टॉप गन्स चित्रपट प्रदर्शित झाले आहे.

अक्षय़च्या चाहत्यांना पृथ्वीराजकडून मोठ्या कमाईच्या अपेक्षा आहेत. मात्र समोर असलेल्या विक्रमला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद वाढतो आहे. विक्रमच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी मोठी दाद दिली होती. यावर्षी सर्वाधिक मोठी ओपनिंग ही कार्तिक आर्यनच्या भुल भुलैय्याला मिळाली. सम्राट पृथ्वीराज ही एक पिरियड फिल्म आहे. या चित्रपटाचे बजेटही मोठे आहे. त्याच्याबद्दल जेवढी प्रसिद्धी करण्यात आली त्या तुलनेत त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र निराशाजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सम्राट पृथ्वीराजनं दुसऱ्या दिवशी 12 ते 13.30 कोटीची कमाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Tollywood Vs Bollywood Samrat Prithviraj Movie second day collection
कसा आहे अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज'?काय म्हणतायत प्रेक्षक;वाचा Public Review

तब्बल दोनशे कोटींचे बजेट असलेल्या पृथ्वीराजला अजुन मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पृथ्वीराजला प्रतिसाद देणं जास्त महत्वाचं आहे. दुसरीकडे पृथ्वीराजला टक्कर देण्यासाठी कमल हासन यांचा विक्रम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com