Tony ban gaya Mama-Tony Kakkarनेहा आणि नेहाच्या कुटुंबाने सांगितले तिच्या प्रेग्नंट असल्याच्या बातमीमागचे सत्यNeha Kakkar,Rohanpreet SIngh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neha Kakkar,Tony Kakkar

नेहा कक्करची 'ती' बातमी अखेर ठरली खरी!

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या(Neha Kakkar)आवाजाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. तिने सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर केली अनं त्याच्यावर भरभरून कमेंट्स नं मिळाल्या तर नवलंच म्हणावे लागेल. गेल्या डिसेंबरमध्ये नेहा कक्कर प्रेग्नंट असल्याच्या बातमी वादळासारखी पसरली. आणि त्या बातमीनं नेहा-रोहनप्रीतसोबत त्यांच्या सबंध कुटुंबाला धक्का बसला होता. त्यानंतर त्या दोघांनीही हा व्हिडिओ त्यांच्या 'ख्याल रखिया करो' या नवीन म्युझिक व्हिडिओचा एक भाग आहे असं स्पष्टिकरण दिलं होतं. पण तरीही नेहाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या अद्यापही मधून मधून डोकं वर काढीत असतात. म्हणूनच नेहा आणि फॅमिलीनं तिच्या प्रेग्नंसीवर स्पष्टिकरण दिलंय एका व्हिडीओच्या माध्यमातून.

नेहा कक्कर ही सोशल मीडिया 'क्वीन' आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर आता 'लाइफ ऑफ कक्कर' ही एक नवीन सिरीज भेटीला आणलीय. या सिरीजचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला. या भागात नेहा आणि नेहाच्या कुटुंबाने तिच्या प्रेग्नंट असल्याच्या बातमीमागची गंमत या व्हिडीओच्या माध्यमातून सादर केली आहे. नेहा कक्करचा हा व्हिडिओ नक्की पहा.

या व्हिडिओच्या सुरुवातीला नेहाचा भाऊ आणि सिंगर टोनी कक्कर(Tony Kakkar) एका खेळण्याच्या दुकानात येतो. आणि खूप सारे गिफ्ट्स तिथे विकत घेऊन तो 'टोनी बन गया मामा' हे आपल्या सुरेल आवाजात गातो. तेव्हा लगेचच नेहाचा नवरा सिंगर रोहनप्रीत सिंगला त्याची आई फोन करून ह्या आनंदाच्या बातमीसाठी शुभेच्छा देते. पण नेहाने आपल्यापासून ही बातमी लपवून ठेवली यासाठी रोहनप्रीत मात्र नाराज झालेला दिसतोय. त्याची आई त्याला पुढे सांगते,'नेहाची काळजी घे. ती नीट खाते-पिते का याकडे लक्ष ठेव. तिला हेल्दी फूड खायला सांग वगैरे वगैरे.' आणि लगेचच तेवढ्यात नेहा प्रेग्नंसी टेस्ट रिपोर्ट घेऊन रोहनकडे येते आणि रोहनप्रीतला घट्ट मिठी मारते. तेवढ्यात टोनी कक्कर तिथे येतो आणि म्हणतो,'मी आमच्या कुटुंबात सर्वात आहे,मला आता माझ्यापेक्षा कुणीतरी लहान हवा आहे. तेव्हा नेहा त्याला 'खोटारडा' म्हणून संबोधते. आणि सांगते की, मी तुझ्यापेक्षा लहान आहे. लगेचच तिची आईही कॅमे-यासमोर येऊन या गोष्टीला पुष्टी देते.

हेही वाचा: माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले

हा व्हिडीओमधला विनोदाचा भाग सोडला तर यात नेहानं आपल्या प्रेग्नंसीच्या बातमीविषयी सांगताना तिला प्रवासादरम्यान आलेला एक मजेदार अनुभव शेअर केलाय. ती म्हणते,''एकदा विमानातनं प्रवास करीत असताना एका एअरहॉस्टेसनेही मला विचारलं होतं की तुम्ही खरंच प्रेग्नंट होतात का?", लगेच टोनी कक्कर मध्येच म्हणाला,''मी एकदा हॉटेलमध्ये बसलो होतो. तेव्हा वेटर माझी ऑर्डर घ्यायच्या आधीच मला विचारू लागला, 'सर आप मामा बननेवाले हो क्या?'. रोहनप्रीत सिंगही म्हणाला की,"नेहा आई होणार ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या मित्रांना माझा राग आला. त्यांना वाटलं की इतकी आनंदाची बातमी मी त्यांच्यापासून का लपवून ठेवली? या सगळ्यावर स्पष्टिकरण देताना नेहा पुढे म्हणाली,"मी खरंतर इंडियन आयडलमधनं ब्रेक घेतला होता तो स्वतःला-कुटुंबाला वेळ देण्यासाठी. आराम करण्यासाठी. पण लोकांना वाटलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून मी हा ब्रेक घेतलाय. खरं तर ही सगळी गडबड यामुळे झाली की ब्रेक घेतल्यावर माझं थोडं वजन वाढलं आणि त्यामुळे थोडं पोटही दिसू लागलं. असं सांगून तिनं लोकांना सवाल केलाय की, नेहा कक्करही थोडी चब्बी दिसू शकते नाही का. पण याचा अर्थ मी प्रेग्नंट आहे असा होऊ शकत नाही. मला आणि रोहनप्रीतला पुढचे दोन ते तीन वर्ष फॅमिली प्लॅन करायची नाही. सध्या खूप काम करायचंय."

या सगळ्यावर स्पष्टिकरण देताना नेहा पुढे म्हणाली,"मी खरंतर इंडियन आयडलमधनं ब्रेक घेतला होता तो स्वतःला-कुटुंबाला वेळ देण्यासाठी. आराम करण्यासाठी. पण लोकांना वाटलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून मी हा ब्रेक घेतलाय. खरं तर ही सगळी गडबड यामुळे झाली की ब्रेक घेतल्यावर माझं थोडं वजन वाढलं आणि त्यामुळे थोडं पोटही दिसू लागलं. असं सांगून तिनं लोकांना सवाल केलाय की, नेहा कक्करही थोडी चब्बी दिसू शकते नाही का. पण याचा अर्थ मी प्रेग्नंट आहे असा होऊ शकत नाही. मला आणि रोहनप्रीतला पुढचे दोन ते तीन वर्ष फॅमिली प्लॅन करायची नाही. सध्या खूप काम करायचंय."

loading image
go to top