बॉलीवूड आता ''बॅक टू वर्क''; हे 10 सेलिब्रेटी शुटिंग लोकेशनवर 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 16 October 2020

गेल्या काही महिन्यांपासून चित्रिकरण थांबल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. आता वातावरणात थोडा बदल होत असल्याने बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी कामाला सुरुवात केली आहे.

मुंबई - कोरोनावर मात करुन परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चित्रिकरण थांबल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. आता वातावरणात थोडा बदल होत असल्याने बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी कामाला सुरुवात केली आहे. यात कोणत्या कलाकार पुन्हा सेटवर पोहचले त्या कलाकारांचे अपडेट खास तुमच्यासाठी 

1. अक्षय कुमार - काही दिवसांपूर्वी युके मध्ये अक्षयने त्याच्या बेलबॉटम या चित्रपटाचे चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर फोटोही शेयर केले आहेत. विशेष म्हणजे युकेमध्ये गेल्यावर त्याठिकाणी दोन आठवड्यांचा क्वॉराईनटाईन कालावधीही अक्षयने पूर्ण केला आहे. 20 ऑगस्टला अक्षयने याबाबतची माहिती शेयर केली आहे.  कोरोनाचे नियम पाळुन पुन्हा एकदा नव्या जोमोने चित्रिकरणाला सुरुवात असे त्याने म्हटले आहे. 

Bell Bottom Trailer | Akshay Kumar | Jackky Bhagnani | Manushi Chhillar -  YouTube

2 . रणवीर कपूर - रणवीरने नुकतेच काही जाहिरातींचे काम सुरु केले आहे. एका वेगळ्या लूकमध्ये रणवीर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. खरे तर गेल्या सहा महिन्यांपासून रणवीरने कामाला सुरुवात केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या रणवीरकडे मोठ्या प्रमाणात अनेक ब्रँडच्या जाहिराती आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन तो आठवड्यातील तीन दिवस आठ तास अशा हिशोबाने काम करत आहे. 

5 Ranveer SinghInspired Hairstyles That Will Leave Your Girlfriend Swooning

3 . दीपिका पादुकोण -  आपला सहकारी सिध्दांत चतुवेदी याच्या समवेत दीपिका शुटिंगसाठी गोव्याला रवाना झाली होती.  याविषयीची माहिती तिने सोशल अकाऊंटवरुन प्रसिध्द केली आहे. एक फोटो व्हायरल करुन त्याखाली "3 day to go" असे तिने लिहिले आहे. दीपिका गेल्या सहा महिन्यांपासून घरी क्वॉरानटाईन आहे. 

Deepika Padukone makes bizarre claims in front of NCB

  4. करिना कपूर खान - करिनाही लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या शुटिंगसाठी नुकतीच जाऊन आली. त्यावेळचे अनुभन तिने शेयर केले आहेत. चित्रिकरणावेळी प्रेग्नंट असणा-या करिनाने सहकलाकारांनी सहकार्य केल्याचे सांगितले. 

Kareena Kapoor Wiki, Age, Boyfriend, Husband, Family, Caste, Biography &  More – WikiBio

 5. अनन्या पांडे - पती पत्नी और वो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये इंट्री करणा-या अनन्या पांडेने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. सेटवरील काही फोटोही तिने यावेळी शेयर केले आहे. सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पीपीई कीटचा वापर केला जात असल्याचे तिने म्हटले आहे. 

We have stopped valuing human relationships: Ananya Panday | Entertainment  News,The Indian Express

 6. आलिया भट - ब्रम्हास्त्रच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने अलिया आणि रणबीर कपुर शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे काही काळ चित्रिकरणाला मर्यादा आल्या होत्या. आता त्य़ाचे डबिंग सुरु आहे. 

Alia Bhatt investment: know how alia bhatt invest her money | Navbharat  Times Photogallery

 7. रणबीर कपूर - आयन मुखर्जी यांनी ब्रम्हास्त्र चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात बराच काळापासून रखडलेली कामे आता वेगाने सुरु करण्यात आली आहे. त्यात रणवीर बिझी आहे. 

LEAKED! The location shoot details of Ranbir Kapoor and Alia Bhatt's next  film Dragon | India.com

8.  सनी लिओनी -  सनी ही सध्या तिच्या नव-यासोबत लॉस एजेंलिस याठिकाणी आहे. तिच्याबरोबर तिची मुलेही आहेत. याविषयी तिने एक फोटो शेयर केला आहे. कोरोनाच्या काळात तिच्या एका गाण्याचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. कुणा एखाद्यामुळे कोरोनाची बाधा येऊ नये याची काळजी घेण्यात आल्याचे सनीने सांगितले. 

Karenjit Kaur: The Untold Story Of Sunny Leone Trailer- Watch Sunny Leone's  biopic web series bold trailer | Web News – India TV

9. मलाईका अरोरा - डान्सच्या रियालिटी शो मधून अभिनेत्री मलाईका अरोरा हिने कम बॅक केले आहे. याविषयी तिने सांगितले आहे. चार महिन्यांनंतर घराबाहेर पडून कामाला सुरुवात केली असल्याचा उल्लेख मलाईकाने केला आहे. सध्याची परिस्थिती सदासर्वकाळ अशीच राहिल असे नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. कोरोनाचा संसर्ग होऊ यासाठी काळजी घेणे गरजेजं आहे असे तिने म्हटले आहे. 

Want Bod Like Malaika Arora? These Are Her Fitness Secrets!

10. श्रध्दा कपूर - श्रध्दानेही आपल्या सोशल अकाऊंटवरुन कार्यरत असल्याचे सांगितले आहे. आता काही जाहिरातींचे चित्रिकरण सुरु केले आहे. तिचा लॉकडाऊनपूर्वी बागी 3 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

Shraddha Kapoor Wiki, Height, Age, Boyfriend, Family, Biography & More –  WikiBio

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TOP 10 Celebs who resumed work in the new normal