#HBDKamalHaasan कमल हसन यांच्या 'या' Top 10 गाण्यांनी केली जादू!

टीम ईसकाळ
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कमल हसन यांनी त्यांच्या अभिनयाने एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला फिल्मी प्रवास सुरू केला तो आजवर सुरू आहे.

अप्पू राजा, सदमा, विश्वरूपम, चाची 420, एक दूजे के लिए अशा उत्तम चित्रपटाद्वारे उत्कृष्ट कलाकृती आपल्यासमोर सादर करणाऱ्या कमल हसन यांचा आज 64वा वाढदिवस! कमल हसन यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला. त्यांच्या काही भूमिका तर आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.  

Image result for kamal haasan

कमल हसन यांनी त्यांच्या अभिनयाने एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला फिल्मी प्रवास सुरू केला तो आजवर सुरू आहे. 12 ऑगस्ट 1959 मध्ये कलतूर कन्नम्मा या तमिळ चित्रपटातून कमल यांनी बालकलाकार म्हणून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. सर्वोत्तम आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. 

अजरामर भूमिका
अप्पू राजा मधील त्यांनी साकारलेली बुटक्या मुलाची भूमिका, सदमामधील मनोरूग्ण तरूणीला सांभाळणाऱ्या साध्या तरूणाची भूमिका, सागरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेल्या प्रियकराची भूमिका, एक दूजे के लिएमधील प्रेमात आकंठ बुडालेल्या एका वेड्या प्रियकराची भूमिका, विश्वरूपममधील धार्मिक भूमिका, चाची 420 मध्ये स्त्रीवेशातील भूमिका... अशा सर्वच भूमिका आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. 

Related image

गाजलेली गाणी
कमल हसन यांच्या भूमिकांसह त्यांची अनेक गाणीही गाजली. आजही ती गाणी प्रत्येकजण गुणगुणतो... मग ते सुरमयी आखियों मे असू दे किंवा तेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन असू दे... कमल हसन यांच्या सर्वच गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे.  

1. तेरे मेरे बीच में

2. ए जिंदगी गले लगा ले 

3. ओ मारिया 

4. सच मेरे यार है 

5. सूरमयी आखियों मे नन्हा-मुन्ना एक सपना दे जा रे 

6. चुपडी चुपडी चाची

7. मुकुंदा मुकुंदा

8. सोलाह बरस की बाली उमर को सलाम

9. हम बने तुम बने एक एक दुजे के लिए 

10. आया है राजा लोगो रे लोगो 

आज कमल हसन यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर  #HBDKamalHaasan आणि #HappyBirthdayKamalhaasan असे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top 10 songs of Kamal Haasan on his 64th Birthday